Wednesday , 19 June 2024
Home घडामोडी BJP Social Media Team : शरद पवारांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या तरुणाला भाजपाकडून संधी; भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया कार्यकारणी जाहीर
घडामोडी

BJP Social Media Team : शरद पवारांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या तरुणाला भाजपाकडून संधी; भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया कार्यकारणी जाहीर

BJP Social Media Team
BJP Social Media Team : Letstalk

BJP Social Media Team : भारतीय जनता पार्टीकडून (भाजपा) महाराष्ट्र सोशल मीडिया कार्यकारणीच्या 21 पदाधिकाऱ्यांची यादी भाजपाचे महाराष्ट्राचे प्रदेशध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी जाहीर केली आहे. भाजपाने सोशल मीडिया सेलच्या 21 पदाधिकाऱ्यांची नवे जाहीर केल्यानंतर एक नवा वादंग उठला आहे. कारण ह्या पदाधिकाऱ्यांमध्ये शरद पवारांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या तरुणाच नाव आलं आहे.

BJP Social Media Team : कोण आहे हा तरुण?

काही महिन्यांपूर्वी शरद पवार यांच्या विषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणारा हा तरुण आता भाजपाच्या सोशल मीडिया सेलचा पदाधिकारी बनला आहे. सोशल मीडिया सेलच्या या पदाधिकऱ्यांचा नाव निखिल भामरे आहे. हा निखिल भामरे नाशिक जिल्ह्याच्या सटाणा तालुक्यात राहतो. काही दिवसांपूर्वी निखिल भामरेने शरद पवारांबद्दल काही आक्षेपार्ह पोस्ट केल्या होत्या. त्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, ‘वेळ आली आहे, बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची. बाराचाकाका माफी माग’ असं त्या पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये लिहिलं होत.

हे वाचा: Morocco Earthquake - मोरोक्कोमध्ये भूकंप

ह्यानंतर निखिल भामरेविरुद्ध राज्यातील 7 ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते तसेच तो 50 दिवस तुरुंगातही होता. मुख्य बाब म्हणजे ज्यावेळी निखिल भामरेने वादग्रस्त पोस्ट केली होती, त्यावेळी त्याचा भाजपशी संबंध जोडण्यात आला होता. मात्र त्यावेळी भाजपकडून साफ नकार देण्यात आला होता, आता त्याच निखिल भामरेकडे शोषलं मीडियाची जवाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना तोंड फुटलं आहे.

BJP Social Media Team : भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया कार्यकारणी जाहीर :

भाजपने जाहीर केलेल्या या सोशल मीडियाच्या कार्यकरणीमध्ये अनेक तरुणांना संधी देण्यात आली असल्याचं बोलला जात आहे. तसेच याबद्दलची माहिती भाजपाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत दिली आहे.

BJP Social Media Team : चंद्रशेखर बावनकुळे यांचं ट्विट :

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया कार्यकारणी जाहीर केली आहे. ह्यामध्ये प्रकाश गाडे यांची संयोजक म्हणून तर सागर फुंडकर, सरदार लकी सिंह चावला, चंद्रभूषण, पीयूष जगदीश कश्यप आणि निखिल भामरे यांची सहसंयोजक म्हणून नियुक्ती केली. सर्व पदाधिकारी भाजपा पक्ष संघटनेचे आणि भाजपा सरकारचे काम सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करतील. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!”

हे वाचा: Rain Update : राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय..! राज्यभर मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज.

हे वाचा: New Parliament Special Session : नवीन संसदेत विशेष अधिवेशनSubscribe Now

    Subscribe to our mailing list to receives daily updates direct to your inbox!