Saturday , 27 April 2024
Home Jobs ZP Recruitment 2023 : जिल्हा परिषदमध्ये 19,000 पेक्षा अधिक जागांवर मेगा भरती सुरु.
Jobs

ZP Recruitment 2023 : जिल्हा परिषदमध्ये 19,000 पेक्षा अधिक जागांवर मेगा भरती सुरु.

ZP Recruitment 2023
ZP Recruitment 2023 : Letstalk

ZP Recruitment 2023 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. कारण महाराष्ट्रातील सर्वात मोठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. राज्यातील जिल्हा परिषदमध्ये (जिल्हा परिषद भरती 2023) विविध पदांसाठी तब्बल 19 हजारांपेक्षा पेक्षा अधिक जागांवर मेगा भरती सुरु झालेली आहे. यामध्ये दहावी पास ते इंजिनिअर पर्यंत शिक्षण पूर्ण असलेलं तरुण अर्ज करू शकतात. त्यामुळे तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची ही मोठी संधी आहे. जाणून घ्या या भरती बाबत सविस्तर माहिती.

ZP Recruitment 2023
ZP Recruitment 2023 : जिल्हा परिषद भरती 2023

ZP Recruitment 2023 : जिल्हा परिषदमध्ये मेगा भरती सुरु.

राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या जागा सुटल्या आहेत. याबाबतची जाहिरात शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत विविध जिल्ह्यांतील तब्बल 19 हजार 460 जागा भरल्या जाणार आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा? कोण-कोणत्या रिक्त पदासाठी भरती होणार आहे? शैक्षणिक पात्रता काय? जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती.

हे वाचा: IBPS Recruitment 2023 : IBPS मार्फत 8 हजारांपेक्षा अधिक जागांवर भरती होणार; अर्ज कसा करायचा? पहा.

ZP Recruitment 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्जप्रक्रिया

पदांबाबतचा संपूर्ण तपशील खालीलप्रमाणे –

पद क्र पदाचे नाव शैक्षणिक पात्रता व अनुभव  वयोमर्यादा
1 आरोग्य पर्यवेक्षक 1) विज्ञान शाखेतील पदवी

2) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्यांचा कोर्स

18 ते 40 वर्षे
2 आरोग्य सेवक (पुरुष) 10वी उत्तीर्ण 18 ते 47 वर्षे
3 आरोग्य सेवक (महिला) सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद 18 ते 42 वर्षे
(मागास प्रवर्ग – 18 ते 42 वर्षे)
4 औषध निर्माण अधिकारी B.Pharm, D.Pharm 18 ते 40 वर्षे
5 कंत्राटी ग्रामसेवक 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा/पदवी 18 ते 40 वर्षे
6 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा 18 ते 40 वर्षे
7 कनिष्ठ अभियंता (विद्युत) विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा 18 ते 40 वर्षे
8 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा 18 ते 40 वर्षे
9 कनिष्ठ आरेखक 1) 10वी उत्तीर्ण

हे वाचा: SSC JE Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'या' पदांसाठी मेगा भरती सुरु.

2) स्थापत्य आरेखक कोर्स

18 ते 40 वर्षे
10 कनिष्ठ यांत्रिकी 1) तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्स

2) 05 वर्षे अनुभव

18 ते 40 वर्षे
11 कनिष्ठ लेखाधिकारी 1) पदवीधर

2) 05 वर्षे अनुभव

18 ते 40 वर्षे
12 कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) 1) 10वी उत्तीर्ण

हे वाचा: IDBI Bank Recruitment 600 Posts : IDBI बँकेत भरती.

2) मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.

18 ते 40 वर्षे
13 कनिष्ठ सहाय्यक (लेखा) 1) 10वी उत्तीर्ण

2) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

18 ते 40 वर्षे
14 तारतंत्री तारतंत्री प्रमाणपत्र 18 ते 40 वर्षे
 15 जोडारी 1) 04थी उत्तीर्ण

2) 02 वर्षे अनुभव

18 ते 40 वर्षे
 16  पर्यवेक्षिका समाजशास्त्र / गृहविज्ञान/शिक्षण/ बालविकास/पोषण पदवी 21 ते 40 वर्षे
 17  पशुधन पर्यवेक्षक पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य. 18 ते 40 वर्षे
18 प्रयोगशाळा तंत्रज्ञ भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी पदवी 18 ते 40 वर्षे
19 यांत्रिकी 1) 10वी उत्तीर्ण

2) ITI (यांत्रिकी/विद्युत/ऑटोमोबाईल) प्रमाणपत्र

18 ते 40 वर्षे
20 रिगमन (दोरखंडवाला) 1) 10वी उत्तीर्ण

2) अवजड वाहन चालक परवाना

3) 01 वर्ष अनुभव

18 ते 40 वर्षे
21  वरिष्ठ सहाय्यक लिपिक पदवीधर 18 ते 40 वर्षे
22 वरिष्ठ सहाय्यक लेखा 2) B.Com

2) 03 वर्षे अनुभव

18 ते 40 वर्षे
23 विस्तार अधिकारी (कृषी) कृषी पदवी किंवा समतुल्य 18 ते 40 वर्षे
24 विस्तार अधिकारी (सांख्यिकी) विज्ञान,कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/सांख्यिकी विषयासह पदवी 18 ते 40 वर्षे
25  विस्तार अधिकारी (शिक्षण) 1) 50% गुणांसह B.A/B.Sc किंवा B.Com

2) B.Ed

3) 03 वर्षे अनुभव

18 ते 40 वर्षे
26  विस्तार अधिकारी (पंचायत) विधिद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी. 18 ते 40 वर्षे
27 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे) 10वी उत्तीर्ण +स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी डिप्लोमा पदव्युत्तर पदवी 18 ते 40 वर्षे
28 लघुलेखक (उच्चश्रेणी) 1) 10वी उत्तीर्ण

2) इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि.

3) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.

18 ते 40 वर्षे
ZP Recruitment 2023
ZP Recruitment 2023 : Letstalk

जिल्हा परिषद भरती 2023 : जिल्हानिहाय पद संख्या –

अ.क्र. जिल्हा  पद संख्या  अ.क्र.  जिल्हा  पद संख्या
1 अहमदनगर 937 18 नांदेड 628
2 अकोला 284 19 नंदुरबार 475
3 अमरावती 653 20 नाशिक 1038
4 छ. संभाजी नगर (औरंगाबाद) 432 21 उस्मानाबाद 453
5 बीड 568 22 पालघर 991
6 भंडारा 320 23 परभणी 301
7 बुलढाणा 499 24 पुणे 1000
8 चंद्रपूर 519 25 रायगड 840
9 धुळे 352 26 रत्नागिरी 715
10 गडचिरोली 581 27 सांगली 754
11 गोंदिया 339 28 सातारा 972
12 हिंगोली 204 29 सिंधुदुर्ग 334
13 जालना 467 30 सोलापूर 674
14 जळगाव 626 31 ठाणे 255
15 कोल्हापूर 728 32 वर्धा 371
16 लातूर 476 33 वाशिम 242
17 नागपूर 557 34 यवतमाळ 875

वयोमर्यादा :

या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष 25 ऑगस्ट 2023 पर्यंत सरासरी 18 ते 47 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच यामध्ये मागासवर्गीयांना म्हणजेच SC आणि ST या प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षांची सूट असणार आहे. तसेच पदांनुसार वयाची मर्यादा ही वेगवेगळी असणार आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

शुल्क :

या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जनरल आणि ओबीसी (OBC) या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये (₹1000/-) शुल्क असणार आहे तर एससी (SC), एसटी (ST) आणि पीडब्ल्यूडी (PWD) अशा मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना नऊशे रुपये (₹900/-) शुल्क असणार आहे. तसेच माजी सैनिकांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही.

ZP Recruitment 2023
जिल्हा परिषद भरती 2023

ZP Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अधिकृत वेबसाईट – येथे पाहा.

जाहिरात (Notification) – अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा.

ऑनलाईन अर्ज – येथे Click करा.

ZP Recruitment 2023 : महत्वाच्या तारखा –

या भरती प्रक्रियेत भाग घेण्यासाठी तुम्हाला 25 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तसेच परीक्षा कधी घेण्यात येणार आहे? याबाबतची संपूर्ण माहिती नंतर कळविण्यात येणार आहे.

या भरती प्रकियेबाबत काही अडचण आल्यास तुम्ही अधिक माहितीसाठी वरील जाहिरात पाहू शकता.







Subscribe Now

    Subscribe to our mailing list to receives daily updates direct to your inbox!

    Related Articles

    MUCBF Recruitment 2024
    Jobs

    MUCBF Recruitment 2024 : बँकेत नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

    MUCBF Recruitment 2024 : तरुणांना बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी आहे. महाराष्ट्र...

    AIIA Recruitment 2024
    Jobs

    AIIA Recruitment 2024 : अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये भरती सुरु; असा करा अर्ज.

    AIIA Recruitment 2024 : तरुणांना नोकरी करण्याची संधी आहे. आखिल भारतीय संस्थेमध्ये...

    BIS Recruitment 2024
    Jobs

    BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

    BIS Recruitment 2024 : तरुणांना सरकारी नोकरी करण्याची महत्वाची संधी आहे. भारतीय...

    SBI Clerk Recruitment 2023
    Jobs

    SBI Clerk Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदांच्या 8 हजार 283 जागांसाठी भरती सुरु.

    SBI Clerk Recruitment 2023 : बँकेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी भारताची...