Nashik Police Patil Bharti 2023 : नाशिक जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये पोलीस पाटील’ पदांसाठी भरती सुरु झालेली आहे. ह्या भरती अंतर्गत तब्बल 666 जागा भरण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी- त्र्यंबकेश्वर, कळवण, चांदवड, दिंडोरी, नाशिक, निफाड, बागलाण, मालेगाव आणि येवला या तालुक्यासाठी ही भरती होणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती.
Nashik Police Patil Bharti 2023 : नाशिक जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांसाठी भरती सुरु
नाशिक जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांसाठी भरती सुरु झालेली आहे. या बाबतची जाहिरात नाशिकच्या संबंधित विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे नाशिकच्या स्थानिक उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. या भरती मध्ये भाग घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ह्यासाठी उमेदवार दहावी पास असणे आणि तेथील स्थानिक रहिवाशी असणे गरजेचे आहे. ह्या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून ह्या या बाबतची संपूर्ण माहिती.
हे वाचा: Government Job : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 जागांसाठी भरती होणार.
Nashik Police Patil Bharti 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्ज प्रक्रिया
पदांचा संपूर्ण तपशील खालील प्रमाणे
पदाचे नाव : पोलीस पाटील
हे वाचा: Exim Bank Recruitment 2023 : भारतीय निर्यात-आयात (India Exim Bank) बँकेत भरती सुरु; अर्ज कसा करायचा?
पदसंख्या :
- इगतपुरी- त्र्यंबकेश्वर – 100 जागा
- कळवण – 119 जागा
- चांदवड – 59 जागा
- दिंडोरी – 116 जागा
- नाशिक – 22 जागा
- निफाड – 69 जागा
- बागलाण – 57 जागा
- मालेगाव – 63 जागा
- येवला – 61 जागा
एकूण जागा : 666 जागा
शैक्षणिक पात्रता :
हे वाचा: Talathi Bharti 2023 : 4 हजारांहून अधिक जागांसाठी तलाठी भरती सुरु; असा करा अर्ज.
(1) 10 वी उत्तीर्ण
(2) स्थानिक रहिवासी
वयोमर्यादा :
या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष 26 सप्टेंबर 2023 पर्यंत 20 ते 45 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे.
शुल्क :
या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना सहाशे रुपये (₹600/-) शुल्क असणार आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना पाचशे रुपये (₹500/-) शुल्क असणार आहे.
Nashik Police Patil Bharti 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पहा.
जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा.
ऑनलाईन अर्ज – येथे करा.
Nashik Police Patil Bharti 2023 : महत्वाच्या तारखा
वरील भरती प्रक्रियेत 08 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. तसेच या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.