Tuesday , 7 January 2025
Home घडामोडी Maratha Reservation : मनोज जरांगेची तब्येत बिघडली
घडामोडी

Maratha Reservation : मनोज जरांगेची तब्येत बिघडली

Jalana Maratha Reservation
Maratha Aarkashan

उपोषण अजूनही सुरूच असल्याने मनोज जरांगेची तब्येत बिघडली.

मराठा आरक्षण मिळावे ह्यासाठी उपोषणाला बसलेले मराठवाड्यातील मनोज जरांगे ह्यांच्या उपोषणाचा आज ९वा दिवस आहे. हे उपोषण मागे घ्यावं यासाठी राज्य सरकारकडून बरेच प्रयत्न सुरू आहेत. सरकारमधील अनेक नेते प्रत्यक्ष येऊन भेट घेऊन गेले आहेत. तर विरोधी पक्षातल्या अनेकांनी सुद्धा मनोज जरांगे ह्यांची भेट घेतली आहे. आपल्या उपोषणाच्या निर्धारावर मनोज जरांगे ठाम आहेत. कोणत्याही परिस्थितीत उपोषण सोडायचं नाही असा निर्धार जरंगे ह्यांनी केल्याने त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांना टेन्शन आलं आहे.

हे वाचा: Ahmednagar News 2023 : राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत गजानन हाॅस्पिटलमध्ये मूक बधीरपणाची मोफत तपासणी

Jalana Maratha Reservation
Maratha Aarkashan

वैद्यकीय पथक उपोषणस्थळी दाखल झाले असून मनोज जरांगे ह्यांची तपासणी डॉक्टरांनी केली आहे. तपासणी केल्यावर त्यांच्या शरीरातील पाणी कमी झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना सलाईन लावण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

मनोज जरांगे ह्यांना सलाईन लावून त्यांच्यावर वैद्यकीय देखरेख सुरु आहे.

पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे ह्यांनी देखील आज मनोज जरांगे ह्यांची भेट घेऊन विचारपूस केली.

हे वाचा: LIC Gets Income Tax Penalty Notice Of Rs 84 Cr : LIC ला आयकर विभागाकडून 84 काेटी भरण्याची नाेटीस

आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षावर आणि आंदोलकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांवर आज पोलीस अधीक्षक आणि जरांगे ह्यांच्यामध्ये चर्चा झाली.