Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Change the color of WhatsApp chat : व्हॉट्सअ‍ॅप चॅटचे रंग-रुप बदला, अगदी सोपी ट्रिक माहित करुन घ्या!

0

WhatsApp Chat : तंत्रज्ञानाच्या जमान्यात व्हॉट्सअ‍ॅपने लोकांचं जीवन अगदी सहज सोपं करुन टाकलंय. लोकांच्या सर्व गरजा, कामे, टाईमपास सर्व काही व्हॉट्सअ‍ॅपद्वारे सहज होत आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅपची लोकप्रियता कायम रहावी म्हणून कंपनी सातत्याने नव-नवीन फिचर आणत असते. व्हॉट्सअ‍ॅपने तुमची चॅटिंग मजेदार बनवण्यासाठी एक भारी फीचर आणलंय. यामध्ये चॅट, स्टेटसशी संबंधित अनेक खास फीचर्स देण्यात आलेत.

असे असले तरी अनेकांना माहित असेल की वापरकर्ते त्यांच्या चॅटच्या बॅकग्राऊंडचा वॉलपेपर बदलू शकतात आणि त्यावर त्यांचा स्वतःचा फोटो टाकू शकतात. होय, व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्हाला वैयक्तिक चॅटसाठी युनिक बॅकग्राऊंड वॉलपेपर सेट करण्याची परवानगी देते. चॅटिंगचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वॉलपेपर कसा बदलायचा किंवा तुम्हाला आवडत नसल्यास तो कसा रीसेट करायचा? याबद्दल जाणून घेऊयात…

व्हॉट्सअ‍ॅपवर बॅकग्राऊंड कसा बदलायचा? :
1. सर्वप्रथम व्हॉट्सअ‍ॅप उघडा आणि वरच्या-उजव्या कोपऱ्यात असलेल्या 3 बिंदूंवर टॅप करा.
2. सेटिंग्जवर जा, नंतर चॅट्स निवडा.
3. येथे तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप निवडण्याचा पर्याय मिळेल. वॉलपेपर बदलण्यासाठी बदला वर टॅप करा.
4. आता तुम्हाला अनेक वॉलपेपर दिसतील, तुम्ही तुमचा स्वतःचा फोटो किंवा गॅलरीमधील कोणतीही प्रतिमा बॅकग्राऊंडला सेट करू शकता.
5. स्वतःचा फोटो वापरण्यासाठी गॅलरीमधून फोटो निवडा.
6. तुम्ही एक नवीन वॉलपेपर निवडल्यास, तुम्हाला स्क्रीनवर ‘वॉलपेपर प्रीव्ह्यू’ मिळेल.
7. जेव्हा वॉलपेपर फुल स्क्रीनवर दिसेल, तेव्हा त्याला डीफॉल्ट बॅकग्राऊंड म्हणून सेट करण्यासाठी ‘वॉलपेपर सेट करा’ ला टॅप करा.

व्हॉट्सअ‍ॅप चॅट बॅकग्राउंड कसे रीसेट करावे? :
1. तुम्हाला डीफॉल्ट बॅकग्राउंडवर रीसेट करायचे असल्यास, अ‍ॅपच्या वरच्या उजव्या कोपर्‍यातील 3 डॉट्सवर पुन्हा टॅप करा.
2. चॅटवर गेल्यावर तुम्ही वॉलपेपरच्या पर्यायावर पोहोचाल.
3. येथे वॉलपेपर चेंजेसमध्ये दिसेल, त्यानंतर खालच्या बाजूला डिफॉल्ट वॉलपेपर निवडा.
4. त्यानंतर सेट वॉलपेपरमधून निवडा.

Leave A Reply

Your email address will not be published.