Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

5g network in your phone: तुमच्या फोनमध्ये अजूनही 5Gनेटवर्क नाही? एक छोटी सेटिंग्ज करा आणि…

0

5g network in your phone : 4Gनंतर जवळपास सर्वांनाच 5G ची भुरळ पडलीय. त्यामुळे अलीकडे सर्वच दूरसंचार कंपन्यांनी 5G सेवा सुरू केल्याचे चित्र आहे. असे असले तरी अनेक वापरकर्त्यांना ही सेवा कशी सक्रिय करावी? याबाबत पुरेशी माहिती नाही. जर तुम्ही देखील अशा वापरकर्त्यांमध्ये आहात ज्यांना स्मार्टफोनमध्ये 5G नेटवर्क कसे चालवायचे? हे माहित नाही. तर तुम्हाला आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला अशी एक सोपी सेटिंग सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये 5G नेटवर्कचा आनंद घेऊ शकता.

मोठी शहर सोडली तर Airtel 5G सेवा अनेक लहान शहरांमध्ये कार्यरत आहे. त्यामुळे तुम्ही दिल्ली, वाराणसी, नागपूर, बंगलोर, हैदराबाद, मुंबई, चेन्नई आणि सिलीगुडी इत्यादींसह देशातील सर्व भागांमध्ये या सेवेचा लाभ घेऊ शकता. वरील शहरांमध्ये एअरटेल ग्राहक वेगवान इंटरनेट गती आणि चांगल्या ऑडिओ गुणवत्तेसह कॉलिंगचा आनंद घेऊ शकतील. आज आम्‍ही तुम्‍हाला 5G सेवा सक्रिय कशी करता येईल? याबाबत माहिती देणार आहोत.

जर तुम्हाला तुमच्या 4G एअरटेल सिम कार्डमध्ये 5G नेटवर्क सक्रिय करायचे असेल तर तुम्हाला जास्त अडचण येणार नाही. कारण आज आम्ही तुम्हाला योग्य मार्ग सांगणार आहोत. 5G सेवा सक्रिय करण्यासाठी, प्रथम आपल्या स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये जा. आता मोबाईल नेटवर्कच्या पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्हाला नेटवर्कचा पर्याय दर्शविला जाईल ज्यामध्ये तुम्हाला 5G नेटवर्क सेट करा. एकदा तुम्ही 5G नेटवर्क निवडल्यानंतर, तुम्हाला नेटवर्क आऊटच्या पुढे स्क्रीनच्या टॉपला 5G लोगो दिसेल. ज्यानंतर तुम्हाला कळेल की तुमच्या स्मार्टफोनवर 5G नेटवर्क सक्रिय झाले आहे.

जर तुम्ही आहात त्या ठिकाणी 5G कनेक्टिव्हिटी दिली जात असेल, तर तुम्ही 5G इंटरनेट आणि ऑडिओ कॉलचा लाभ घेऊ शकाल. ही प्रक्रिया अगदी सोपी आहे आणि यासाठी तुम्हाला जास्त वेळ घालवण्याची देखील गरज नाही. भारतीय स्मार्टफोन ग्राहकांसाठी 5G सेवा म्हणजेच पर्वणी ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.