प्रत्येक महिन्यात देशभरात काही बँक सुट्ट्या असतात. पुढचा नवीन महिना फेब्रुवारी असेल, ज्याला सुरुवात व्हायला फार दिवस उरले नाहीत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) जारी केलेल्या पुढील महिन्याच्या बँक सुट्ट्यांच्या यादीनुसार, तुम्हाला फेब्रुवारीमध्ये बरेच दिवस खाजगी आणि सरकारी बँकांमध्ये सेवा मिळणार नाहीत.
दुसरा आणि चौथा शनिवार आणि सर्व रविवार यासह 10 दिवस बँका बंद राहतील. म्हणजेच 4 रविवार आणि 2 शनिवार (दुसरा आणि चौथा) अशा एकूण 6 सुट्ट्या असतील. देशभरातील विविध सण पुढील महिन्यात विविध राज्यांमध्ये साजरे केले जाणार आहेत. यामध्ये हजरत अली जयंती, गुरु रविदास जयंती, लुई-नगई-नी, महाशिवरात्री, लोसार आणि इतर अनेक महत्त्वाच्या सणांचा समावेश आहे.
हे वाचा: Recovery and Cleanup in Florida After Hurricane Ian
फेब्रुवारी 2023 मधील बँक सुट्ट्या राज्य आणि प्रदेशानुसार बदलतील, कारण काही राष्ट्रीय स्तरावर सार्वजनिक सुट्ट्या म्हणून पाळल्या जातील, तर काही स्थानिक सुट्ट्या म्हणून पाळल्या जातील. सणांमुळे अनेक बँकांच्या शाखा विविध राज्यांमध्ये बंद राहणार आहेत.
फेब्रुवारी महिन्यात एकूण 10 दिवस बँका बंद राहतील. परंतु आरबीआयने हे स्पष्ट केले आहे की या सर्व सुट्ट्या संपूर्ण भारतात एकसमान लागू होणार नाहीत आणि सर्व राज्ये आणि प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या असतील. त्यामुळे पुढील महिन्यात बँकेशी संबंधित कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी सुट्टीनुसार बँकेच्या शाखेला भेट देणे हाच योग्य मार्ग आहे. तुम्ही RBI च्या अधिकृत वेबसाईट (https://www.rbi.org.in) ला भेट देऊन बँक सुट्ट्यांची यादी तपासू शकता.
फेब्रुवारी 2023 मध्ये बँक सुट्ट्या खालीलप्रमाणे आहेत :
5 फेब्रुवारी : हजरत अली जयंती, गुरु रविदास जयंती (रविवार)
11 फेब्रुवारी : दुसरा शनिवार
12 फेब्रुवारी : रविवार
15 फेब्रुवारी : लुई-न्गाई-नी (मणिपूर)
18 फेब्रुवारी : महाशिवरात्री
19 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज जयंती (रविवार)
20 फेब्रुवारी : राज्यत्व दिन (अरुणाचल प्रदेश, मिझोरम)
21 फेब्रुवारी : लोसार (सिक्कीम)
25 फेब्रुवारी : चौथा शनिवार
26 फेब्रुवारी : रविवार
हे वाचा: It really have good feeling when you enjoy nature
SBI ने म्हटले आहे की युनियन फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने दोन दिवसीय अखिल भारतीय बँक संपाची घोषणा केली आहे, ज्यामुळे SBI शाखांमधील बँकिंग सेवा प्रभावित होऊ शकतात. 30-31 जानेवारीला हा संप होणार आहे. एसबीआयने शेअर बाजारांना माहिती दिली आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने संपाची नोटीस दिल्याची माहिती भारतीय बँक्स असोसिएशन (IBA) कडून बँकेला देण्यात आल्याची माहिती SBI ने स्टॉक एक्सचेंजला दिली आहे. या युनियन UFBU च्या इतर सदस्यांनी म्हणजे AIBEA, AIBOC, NCBE, AIBOA, BEFI, INBEF आणि INBOC यांनी त्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ 30 आणि 31 जानेवारी 2023 रोजी देशव्यापी बँक संप पुकारला आहे. म्हणजेच 30-31 जानेवारीला दोन दिवस बँकांमध्ये संप होऊ शकतो. विशेष म्हणजे या दोन दिवसांपैकी एकही दिवस सुट्टी नाही. त्यामुळे तुमच्या बँकेशी संबंधित कामाचा निपटारा अगोदरच करा.