IPL Auction 2024 : आयपीएलचा लिलाव नुकताच दुबईमध्ये पार पडला. ह्या वर्षी प्रथमच लिलाव (IPL Auction 2024) भारताबाहेर पार पडला. आणि हा लिलाव ऐतिहासिक देखील ठरला आहे. यंदाच्या लिलावामध्ये अनेक खेळाडू हे करोडपती झाले आहेत. ह्यामध्ये अनकॅप खेळाडूंचा देखील समावेश आहे. तसेच मिचेल स्टार्क हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. तसेच पॅट कमिन्स 2 नंबरचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
IPL Auction 2024 : मिचेल स्टार्क सर्वात महागडा खेळाडू
हे वाचा: टीम इंडिया क्रिकेट वर्ल्ड कपसाठी रेडी - Cricket World Cup 2023 - Team India
मिचेल स्टार्क हा आयपीएलच्या इतिहासातील (IPL Auction 2024) सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. स्टार्कला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी अनेक संघांची चढाओढ लागली होती, पण शेवटी कोलकात्याच्या संघाने बाजी मारली आणि विक्रिमी 24.75 कोटी रुपयांची रक्कम मोजून त्याला आपल्या संघात सामील करून घेतलं. त्याचाच सहकारी पॅट कमिन्स देखील आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला हैद्राबादच्या संघाने 20.5 कोटी रुपये मोजत आपल्या संघात सामील करून घेतलं.
त्यानंतर डॅरेल मिचेलला देखील अपेक्षेपेक्षा जास्त बोली लागली. त्याला चेन्नईच्या संघाने 14 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघामध्ये सामील करून घेतलं. तसेच अल्जारी जोसेफ आणि हर्षल पटेल यांना देखील अपेक्षेपेक्षा जास्त बोली लागली. अल्जारी जोसेफला 11.50 बोली लावत आरसीबीच्या संघाने त्याला आपल्या संघात घेतले तर हर्षलला पंजाबने 11.75 कोटी रुपयांची बोली लावत त्याला विकत घेतले.
IPL Auction 2024 : अनकॅप खेळाडूंचा बोलबाला
यंदाचा लिलाव (IPL Auction 2024) विशेषतः काही अनकॅप खेळाडूंनी गाजवला. स्वप्नात देखील विचार केला नसेल अशी रक्कम या खेळाडूंना मिळाली आहे. २० लाख बेस प्राईझ असलेल्या या खेळाडूंना करोडोंची बोली लागली. ह्यामध्ये समीर रिझवीवर चेन्नईच्या संघाने तब्बल 8.40 करोड रुपयांची बोली लावत आपल्या संघात घेतलं. कुमार कुशगरा या खेळाडूला दिल्लीच्या संघाने 7.20 कोटी रुपयांना विकत घेतलं. स्पेनसर जॉनसनला 10 कोटी रुपयांमध्ये गुजरातने विकत घेतलं. गुजरातने या सोबतच रॉबिन मिन्ज (3.6 कोटी ) आणि सुशांत मिश्रा (2.2 कोटी) यांना आपल्या संघात घेतलं.
IPL Auction 2024 : कोणत्या संघाने कोणते खेळाडू विकत घेतले?
चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)
हे वाचा: ICC World Cup Rivalries : यंदाच्या वर्ड कपमधील काही हाय व्होल्टेज सामने.
- डॅरेल मिचेल (14 कोटी)
- समीर रिझवी ( 8.4 कोटी )
- शार्दूल ठाकूर (4 कोटी)
- मुस्तफिजुर रहमान (2 कोटी)
- रचिन रविंद्र (1.80 कोटी)
- अविनाश रॉय (20 Lakh)
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)
- गेराल्ड कोएत्जी (5 कोटी)
- नुवान तुषारा (4.80 कोटी)
- दिलशान मधुशंका ( 4.6 कोटी)
- मोहम्मद नबी (1.5 कोटी)
- श्रेयस गोपाल (20 लाख)
- नमन धीर (20 लाख)
- अंशुल कंबोज ( 20 लाख )
गुजरात टायटन्स (Gujarat Titans)
- स्पेनसर जॉनसन (10 कोटी)
- शाहरुख खान (7.40 कोटी)
- उमेश यादव (5.80 कोटी)
- रॉबिन मिन्ज (3.6 कोटी )
- सुशांत मिश्रा (2.2 कोटी)
- कार्तिक त्यागी (60 लाख)
- अजमतुल्लाह ओमरजई (50 लाख)
- मानव सुतार (20 लाख)
आरसीबी (Royal Challengers Bangalore)
- अल्जारी जोसेफ (11.5 कोटी)
- यश दयाल (5 कोटी)
- लॉकी फर्गुसन (2 कोटी)
- टॉम करन (1.5 कोटी)
- स्वप्निल सिंह (20 लाख)
- सौरव चव्हाण (20 लाख)
लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants)
- शिवम मावी (6.4 कोटी)
- एम.सिद्धार्थ (2. 40 कोटी)
- डेविड विली (2 कोटी)
- अशन टर्नर (1 कोटी)
- अर्शिन कुलकर्णी (20 लाख)
- मोहम्मद अर्शद खान ( 20 लाख )
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)
- कुमार कुशगरा (7.20 कोटी )
- झाय रिचर्डसन (5 कोटी)
- हॅरी ब्रूक (4 कोटी)
- सुमित कुमार (1 कोटी)
- शाय होप (75 लाख)
- ट्रिस्टन स्टब्स (50 लाख)
- राशीख दर (20 लाख)
- रिकी भूई (20 लाख रुपये)
- स्वस्तिक चिकारा ( 20 लाख )
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)
- रॉवमन पॉवेल ( 7 कोटी)
- शिभम दुबे (5.8 कोटी)
- नांद्रे बर्गर (50 लाख)
- Tom Kohler-Cadmore (20 लाख )
- आबिद मुश्ताक (20 लाख)
पंजाब किंग्स (Punjab Kings)
- हर्षल पटेल (11.75 कोटी)
- रायली रुसो (8 कोटी)
- ख्रिस वोक्स (4.2 कोटी)
- विश्वनाथ प्रताप सिंह (20 लाख)
- शशांक सिंह (20 लाख)
- अशुतोष शर्मा (20 लाख)
- तनय त्यागराजनन (20 लाख)
- प्रिन्स चौधरी (20 लाख)
कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders)
- मिचेल स्टार्क (24.75 कोटी)
- मुजीब रहमान Mujeeb Rahman (2 कोटी)
- शरफन रुदरफोर्ड ( 1.5 कोटी )
- गस अॅटकिन्सन (1 कोटी )
- चेतन साकरिया (50 लाख)
- केएस भरत (50 लाख)
- मनिष पांडे (50 लाख )
- अंगक्रिश रघुवंशी (20 लाख )
- रमनदीप सिंह (20 लाख )
- शाकीब हुसेन (20 लाख )
सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)
- पॅट कमिन्स (20.5 कोटी)
- ट्रेविस हेड (6.80 कोटी)
- जयदेव उनादकट (1.60 कोटी)
- वानंदु हसरंगा (1.5 कोटी)
- आकाश सिंह (20 लाख)
- जाठवेध सुब्रमण्यम (20 लाख रुपये)