Thursday , 8 June 2023
Home Uncategorized World Heritage places in India : भारतातील जागतिक वारसा स्थळे.
Uncategorized

World Heritage places in India : भारतातील जागतिक वारसा स्थळे.

World Heritage places in India : आज जागतिक वारसा दिवस आहे. 1983 पासून 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये भारतातील 40 ऐतिहासिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये 32 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि 1 मिश्रित निकष स्थान समाविष्ट आहेत. जागतिक वारसा स्थळांमध्ये भारताचा सहावा क्रमांक लागतो. पहिल्या क्रमांकावर चीन आणि इटली हे देश आहेत या देशांमध्ये अनुक्रमे 55 वारसा स्थळे स्थळे आहेत. त्यानंतर स्पेन 48 वारसा स्थळे, जर्मनी 46 वारसा स्थळे, फ्रान्स 45 वारसा स्थळे आणि आणि ह्यानंतर भारताचा नंबर लागतो.

आज आपण भारतातील मान्यता असलेली भारतातील जागतिक वारसा स्थळांबद्दल माहिती पाहणार आहोत. ही वारसा स्थळे कोणती आणि कुठे आहेत? जाणून घेऊयात…

हे वाचा: Indian oil : इंडियन ऑईलमध्ये बंपर भरती, जाणून घ्या सर्व काही!

भारतातील जागतिक वारसा स्थळे :

भारतातील वारसा स्थळांचे सांस्कृतिक, नैसर्गिक आणि मिश्रित निकष या विभागाप्रमाणे वर्गीकरण करण्यात आले आहे.

जागतिक दर्जाची भारतातील सांस्कृतिक वारसा स्थळे (जागतिक वारसा म्हणून जाहीर झालेले वर्ष) :

 • अजिंठा लेणी – महाराष्ट्र (1983)
 • वेरुळ लेण्या – महाराष्ट्र (1983)
 • ताजमहल – उत्तर प्रदेश (1983)
 • आग्रा किल्ला – उत्तर प्रदेश (1983)
 • सूर्य मंदिर कोणार्क – ओडिशा (1984)
 • महाबलीपुरम येथील स्मारके – तामिळनाडू (1984)
 • खजुराहो लेण्या – मध्य प्रदेश (1986)
 • फत्तेपूर सिक्री – उत्तर प्रदेश (1986)
 • गोव्यातील चर्चेस – गोवा (1986)
 • पट्टदकलमधील मंदिरे – कर्नाटक (1987)
 • चोल राजांची मंदिरे – तमिळनाडू (1987)
 • एलेफंटा केव्ह्ज/घारापुरीची लेणी – महाराष्ट्र (1987)
 • सांची स्तूप – मध्य प्रदेश (1989)
 • कुतुब मिनार – दिल्ली (1993)
 • हुमायूनची कबर – दिल्ली (1993)
 • भारतातील पर्वतीय रेल्वे – निलगिरी, तामिळनाडू (1999)
 • महाबोधी मंदिर – बोध गया, बिहार (2002)
 • भीमबेटका – मध्य प्रदेश (2003)
 • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- मुंबई, महाराष्ट्र (2004)
 • चंपानेर-पावागढ उद्यान – गुजरात (2004)
 • लाल किल्ला – दिल्ली (2007)
 • राणी की बाव – गुजरात (2014)
 • नालंदा विश्वविद्यालय (महाविहार) – बिहार (2016)
 • जयपूर पिंक सिटी – राजस्थान (2020)
 • अहमदाबाद – गुजरात (2017)
 • व्हिक्टोरियन अॅन्ड आर्ट डेको एन्सेम्बल – मुंबई, महाराष्ट्र (2018)
 • चंदीगड शहर – चंदीगड (2016)
 • काकतिया मंदिर (रामप्पा) मंदिर – तेलंगना (2021)
 • ढोलविरा – गुजरात (2021)

जागतिक दर्जाची भारतातील नैसर्गिक वारसा स्थळे :

 • काझिरंगा नॅशनल पार्क – आसाम (1985)
 • केवलागदेव-घाना नॅशनल पार्क – राजस्थान (1985)
 • मानस वाईल्डलाईफ सॅन्चुरी – आसाम, (1985)
 • नंदा देवी नॅशनल पार्क, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स – उत्तराखंड, (1988,2005)
 • सुंदरबन नॅशनल पार्क – पश्चिम बंगाल, (1987)
 • पश्चिम घाट – महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ, (2012)
 • ग्रेट हिमालयीन नॅशनल पार्क – हिमाचल प्रदेश, (2014)

जागतिक दर्जाची भारतातील मिश्र विभागातील वारसा स्थळे :

 • कांचनगंगा नॅशनल पार्क – सिक्किम (2016)

एकंदरीत जागतिक वारसा स्थळांमध्ये महाराष्ट्राच्या जवळपास 6 स्थळांचा समावेश आहे. या स्थळांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाल्यामुळे या स्थळांना भेट देण्यासाठी आपल्या देशासह आंतराष्ट्रीय पर्यटकांची देखील गर्दी व्हायला लागली आहे.

हे वाचा: 1 मार्च 2023 : आज तुमचा दिवस कसा राहिल? वाचा…

Related Articles

AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु.
Uncategorized

AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु.

AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु. पशुसंवर्धन...

Uncategorized

Job Update : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात विविध पदांसाठी भरती सुरु.

Job Update : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात जवळपास 5 हजार विविध...

Uncategorized

EV Market :EV चे मार्केट आहे फुल्ल जोरात

EV market : इलेक्ट्रिक वाहनांच्या (EVs) बाजारपेठेत लक्षणीय वाढ होते आहे आणि...

मसालेदार मार्केट
Uncategorized

Spicy Market : मसालेदार मार्केट.

Spicy Market : भारतीय मसाल्यांचे मार्केट आता चांगलेच लोकप्रिय झालेले आहे. हा...