Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Keep this app in mobile, never regret… : मोबाइलमध्ये ‘हे’ अ‍ॅप ठेवा, कधीच पश्चाताप होणार नाही…

0

Keep this app in mobile, never regret… : डेटा आणि वैयक्तिक सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन गूगलने नवीन अ‍ॅप आणले आहे. ज्याचे नाव फाईंड माय डिव्हाईस (find my device) असे आहे. हे अ‍ॅप फोनमध्ये असल्यास फोन हरवल्यावरही तुमच्यावर पश्चातापाची वेळ येणार नाही. कारण याच्या मदतीने तुम्ही चोरीला गेलेल्या आणि हरवलेल्या फोनचे लोकेशन अगदी सहज मिळवू शकता. फक्त एवढेच नाही तर याद्वारे तुम्ही चोरीला गेलेल्या फोनमधील वैयक्तिक माहिती, फोटो, व्हिडीओ इत्यादी सुरक्षितपणे डिलीट करू शकता. यासोबतच, तुम्ही तो फोन लॉक करू शकता आणि पासवर्ड देखील बदलू शकता.

अ‍ॅप कसे काम करते? : यासाठी सर्वप्रथम तुम्हाला फोनमध्ये फाईंड माय डिव्हाईस अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर, लॉग इन करा आणि ई-मेलद्वारे तुमचे प्रोफाईल सक्रिय ठेवा. फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास इतर कोणत्याही फोन, लॅपटॉपच्या मदतीने फाईंड माय डिव्हाईसवर तुमच्या फोनवाल्या ई-मेल आयडीने लॉग इन करून फोने कुठे आहे? याचे लोकशन पाहा. तसेच, प्ले साऊंड हा पर्याय वापरून चोरलेला फोन सायलेंटवर ठेवला असला तरी 5 मिनिटंपर्यंत तुम्ही त्यावर रिंग वाजवू शकता.

Keep this app in mobile, never regret

सिक्युअर डिव्हाईस या पर्यायाद्वारे तुम्ही हरवलेला फोन लॉक तर करू शकताच. सोबतच लॉक स्क्रीनवर मेसेज किंवा फोन नंबरही दर्शवू शकता. तर, इरेज डिव्हाईस पर्यायाद्वारे फोनमधील फोटो-व्हिडीओ किंवा अन्य महत्वाची सामग्री डिलिट करण्याचा पर्यायही मिळतो. मात्र या सुविधेसाठी तुमच्या चोरीला गेलेल्या किंवा हरवलेल्या फोनवर इंटरनेट सेवा सुरु असणे आवश्यक आहे.

कशी वाटली माहिती? नक्की कळवा. तसेच आमचे असेच महत्वपूर्ण लेख वाचण्यासाठी लेट्सटॉकला फॉलो करा, लाईक आणि शेअर करा.

Leave A Reply

Your email address will not be published.