Upcoming Smartphones In October 2023 : बाजारामध्ये बिग बजेट स्मार्ट फोन्सची सध्या जास्तच चालती आहे. काही दिवसांपूर्वी iphone 15 लॉन्च झाला, ह्या स्मार्ट फोनला विकत घेण्यासाठी जगभरातील अप्पलच्या स्टोर्समध्ये लोकांची अक्षरशः झुंबड उडाली होती. त्यानंतर आता या मोबाईमध्ये हीटिंग प्रॉब्लेम सह दुसरे प्रॉब्लेम्स येत असल्याच्या तक्रारी ग्राहकांनी केल्या आहेत. जर तुम्हाला ही चांगले फिर्चर्स असलेला स्मार्ट फोन घ्यायचा असेल तर थांबा. कारण या महिन्यामध्ये म्हणजेच ऑक्टोबर 2023 मध्ये Google, Oneplus, Samsung यांसारख्या कंपन्यांचे बिग बजेट स्मार्ट फोन्स लॉन्च होऊ शकतात. कोणकोणते आहेत हे फोन्स? जाणून घ्या या बाबतची सविस्तर माहिती.
Upcoming Smartphones In October 2023 : ऑक्टोबर 2023 मध्ये ‘हे’ स्मार्टफोन लाँच होणार
Upcoming Smartphones In October 2023 : Google Pixel 8 series
गुगल 4 ऑक्टोबर 2023 रोजी त्यांच्या पिक्सेल स्मार्टफोन्सची पुढील सिरीज लाँच करणार आहे. यावेळी, कंपनी पिक्सेल 8 आणि पिक्सेल 8 प्रो ची घोषणा करेल अशी अपेक्षा आहे, या 8 सिरीज च्या दोन्ही स्मार्ट फोनमध्ये टेन्सर G3 चिप असणार आहे. तसेच कॅमेरा देखील उपडेट झालेला असणार आहे. या सोबतच या स्मार्टफोन्समध्ये नवीन एआय सॉफ्टवेअर तसेच व्हिडिओ बूस्ट तंत्रज्ञान वापर करण्यात येणार आहे.
हे वाचा: Swaraj Target 630 : ट्रॅक्टर घ्यायचाय? कमी किमतीतला हा टॅक्टर आहे सगळ्यात भारी.
W8 for it.
Meet #Pixel8 and Pixel 8 Pro live at #MadeByGoogle in 8️⃣ days and sign up for updates at the Google Store: https://t.co/JX9fWazolO pic.twitter.com/IVsllb9rm8
— Made by Google (@madebygoogle) September 26, 2023
हे वाचा: Mahindra Bolero Neo Plus : महिंद्राची नवी 9 सीटर SUV लॉन्च होण्यासाठी सज्ज.
Upcoming Smartphones In October 2023 : OnePlus Open
OnePlus आपल्या पहिल्या फोल्डेबल फोनची घोषणा ऑगस्टमध्ये करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता, परंतु काही कारणांमुळे असं होऊ शकाल नाही. आता असा अंदाज लावला जात आहे की कंपनी लवकरच OnePlus Open या फोल्डेबल स्मार्ट फोनचे अनावरण करेल. हा स्मार्ट फोन Oppo Find N2 वर आधारित आहे. या फोनमध्ये फ्लॅगशिप Snapdragon 8 Gen 2 SoC हे प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. तसेच OnePlus Open हा पेरिस्कोप झूम लेन्स समाविष्ट करणारा कंपनीचा पहिला स्मार्टफोन असल्याचीही अफवा आहे.
हे वाचा: Send WhatsApp messages without saving number : नंबर सेव्ह न करता WhatsApp वर मेसेज कसा करायचा?
OnePlus Open is said to be powered by the Snapdragon 8 Gen 2 chipset and comes with a 7.8-inch primary AMOLED screen. It might be launched sometime later this month. #OnePlus #OnePlusOpen #AnushkaSharmahttps://t.co/eJgr1qc4hQ
— Express Technology (@ExpressTechie) October 1, 2023
Upcoming Smartphones In October 2023 : OnePlus 11R (Red)
OnePlus 7 हा आयकॉनिक लाल रंगाचा वैशिष्ट्य असलेला शेवटचा फोन होता. आता कंपनीने OnePlus 11R ला लाल रंगात लाँच करण्यास सुरुवात केली आहे. या स्मार्टफोन मध्ये 18 GB पर्यंत रॅम आणि 512 GB अंतर्गत स्टोरेज असणार असल्याचं म्हटलं जात आहे.. याच्या मागील बाजूस वर्तुळाकार कॅमेरा सेटअपसह लेदरसारखे फिनिश असण्याची अपेक्षा आहे. स्मार्टफोन Snapdragon 8+ Gen 1 SoC हे प्रोसेसर तसेच OxygenOS 13 वर आधारित असण्याची शक्यता आहे.
Get ready to relive a decade full of emotions. Get ready to relive the red rush.
— OnePlus India (@OnePlus_IN) October 1, 2023
हेही वाचा : 12 Tips for Buying a New Car : नवीन कार घेताय? कोणती काळजी घ्याल?
Upcoming Smartphones In October 2023 : Samsung Galaxy S23 FE
Samsung देखील Galaxy S23 FE ची सिरीज लाँच करणार आहे. कंपनी S23 FE दोन मॉडेल मध्ये लॉन्च करू शकते. ह्या स्मार्ट फोन्समध्ये Exynos 2200 किंवा Snapdragon 8+ Gen 1 SoC हे प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. स्मार्टफोनमध्ये पाणी आणि धूळ प्रतिरोधकतेसाठी IP68 रेटिंग सह येण्याची शक्यता आहे. तसेच त्यात FHD+ रिझोल्यूशनसह कॉम्पॅक्ट 6.5-इंच 120Hz डिस्प्ले असणार आहे.
Epic moments are now closer than ever. Get ready to experience the new epic. Launching soon. #Samsung pic.twitter.com/68xhvNMb3o
— Samsung India (@SamsungIndia) September 22, 2023
Upcoming Smartphones In October 2023 : Vivo V29 सिरीज
Vivo 4 ऑक्टोबर 2023 रोजी त्यांच्या V29 सिरीज ची घोषासना करणार आहे. अधिकृत वेबसाइट मध्ये असलेल्या माहितीनुसार V29 मालिकेत कार्व्ह डिस्प्ले असेल आणि त्यात 2x टेलीफोटो लेन्स देखील समाविष्ट असेल, जे सहसा अनेक मध्यम श्रेणीवर दिसत नाही. फोन हा स्मार्टफोन मॅजेस्टिक रेडसह कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल.
The word is out!
The #TheMasterpiece vivo V29 Series is launching on 04-10-2023 at 12 p.m. pic.twitter.com/t0v2jP4AGf— vivo India (@Vivo_India) September 26, 2023