Oscar : प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार सोहळ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असते. सोन्याचा मुलामा असलेल्या ट्रॉफीसह अनेक वस्तू विजेत्यांना दिल्या जातात. याचवेळी केवळ मानांकन मिळालेल्यांनाही खास गिफ्ट बॅग दिली जाते. या बॅगमध्ये अतिशय महागड्या भेटवस्तूंचा समावेश असतो. प्रतिष्ठित ऑस्कर ट्रॉफी न जिंकताही ज्यांना फक्त नामांकन मिळाले, अशांनाही एक खास गिफ्ट बॅग मिळते. एव्हरीवन विन्स ही खास गिफ्ट बॅग दरवर्षी ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री अशा मुख्य श्रेणीमध्ये नामांकित व्यक्तींना दिलासा म्हणून दिली जाते.
हे वाचा: Accounting Career : अकौंटिंग मध्ये नेमकं काय करियर घडू शकते…?
2002 पासून ‘ डिस्टिक्टीव्ह असेट्स ‘ नावाची ऑस्करशी संलग्न नसलेली लॉस एंजिल्सस्थित कंपनी ही बॅग देते. यंदाच्या बॅगमध्ये अतिशय महागड्या ब्रॅण्डच्या एकूण 60 भेटवस्तू देण्यात आल्या होत्या. जपानी दुधाच्या ब्रेडपासून ते इटालियन बेटावरील सहलीपर्यंत, तसेच कॉस्मेटिक उपचार आणि अनेक लक्झरी लाईफस्टाईल वस्तू, सौंदर्य उत्पादनांचा समावेश त्यात होता.
पॅकेज काय होते? : इटालियन लाईट हाऊसमध्ये 8 लोकांसाठी तीन रात्री (9हजार डॉलर) राहण्याची संधी, ‘ द लाईफस्टाईल’ नावाच्या कॅनेडियन इस्टेटमध्ये (40 हजार डॉलर) चे पॅकेज होते. तसेच गार्डियनच्या म्हणण्यानुसार, यावर्षीच्या भेट वस्तूंमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये जमिनीचा प्लॉट देखील समाविष्ट आहे. मात्र प्लॉटचा आकार आणि नेमकी ठिकाण माहीत नाही. तब्बल 1 लाख 26 हजार डॉलर म्हणजेच जवळपास 1.3 कोटी किमतीच्या भेटवस्तू या बॅगमध्ये होत्याो.
फायदे काय? :
हे वाचा: Red Banana : लाल केळी - महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा अभिनव उपक्रम.
▪️ विजेत्याला रोख रकमेचे पारितोषिक देण्यात येत नाही.
▪️ विजेत्याची ट्रॉफी ब्राँझने बनवलेली असते. तिला 24 कॅरेट सोन्याचा मुलामा असतो.
▪️ पुरस्कार प्राप्त व्यक्तीला एक गिफ्ट बॅग दिली जाते. ज्यात अत्यंत महागड्या (कोट्यवधी) वस्तू या बॅगेत असतात.
▪️ विजेत्यांना आपले मानधन वाढवण्याची संधी मिळते.
▪️ ऑस्कर मिळाल्याने जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळते.
▪️ नव्या चित्रपटांच्या ऑफर्स येण्याची शक्यता वाढते, त्यामुळे त्यांना अधिक मानधन मिळते.