Saturday , 27 April 2024
Home GK The most poisonous scorpion : #जानो कुछ नया : जगातील सर्वात विषारी विंचू.
GK

The most poisonous scorpion : #जानो कुछ नया : जगातील सर्वात विषारी विंचू.

The most poisonous scorpion : #जानो कुछ नया : जगातील सर्वात विषारी विंचू.
The most poisonous scorpion : Letstalk

The most poisonous scorpion : सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्या आहेत.

The most poisonous scorpion : #जानो कुछ नया : जगातील सर्वात विषारी विंचू.
The most poisonous scorpion : Letstalk

सुट्ट्यांमुळे लहान मुले आपल्या मामाच्या गावाला किंवा आपल्या आजी आजोबांकडे गावी आले असतील. गाव म्हटलं की दगड-माती लहान मुलांच्या संपर्कात येतेच.

हे वाचा: Accounting Career : अकौंटिंग मध्ये नेमकं काय करियर घडू शकते…?

अशावेळी वेळी मुलांकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण उन्हाळ्यात विचंवासारखे विषारी किडे हे दगडाखाली लपून बसलेले असतात.

त्यातच जगातील सर्वात विषारी विंचू हा भारतामध्ये आढळतो.

The most poisonous scorpion : जगातील सर्वात विषारी विंचू कोणते?

भारतीय लाल विंचू (हॉटेनटोटा टॅमुलस) :

हा विंचू प्रामुख्याने भारत, पूर्व पाकिस्तान आणि नेपाळच्या पूर्व सखल भागात आढळतो. या विंचूचा डंख अतिशय विषारी आहे.

हे वाचा: What is POCSO Act : पॉक्सो कायदा म्हणजे काय? ह्या कायद्याचा नेमका कश्याप्रकारे उपयोग होतो?

हेही वाचा : Bombay Stock Exchange : बॉम्बे स्टॉक एक्सचेंज

या विंचवाच्या डंखामुळे व्यक्तीला मळमळ, हृदयाच्या समस्या, त्वचेचा रंग खराब होतो तसेच अधिक गंभीर प्रकरणांमध्ये, फुफ्फुसाचा सूज, फुफ्फुसांमध्ये द्रव जमा होतो.

अशा गंभीर संशय उद्भवू शकतात. योग्यवेळी उपचार न झाल्यास व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो.

हे वाचा: Highest Runs and Highest Wicket Takers in World Cup History : ODI क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारे आणि सर्वाधिक विकेट्स घेणारे खेळाडू

The most poisonous scorpion : डेथस्टॉल्कर स्कॉर्पियन (लेयुरस क्विन्क्वेस्ट्रियटस) :

डेथस्टॉल्कर स्कॉर्पियन हा विंचू सहारा वाळवंट, थार वाळवंट,अल्जेरिया, माली, इजिप्त, इथिओपिया, अरबी द्वीपकल्प, कझाकिस्तान आणि पश्चिम भारतामध्ये आढळतो.

हा विंचू देखील जगातील सर्वात विषारी विंचवांपैकी एक आहे.

हा विंचू चावल्याने बाधित व्यक्तीचे हृदयाचे ठोके वाढतात, उच्च रक्तदाब किंवा व्यक्ती कोमा मध्ये देखील जाऊ शकतो.

एवढंच नाहीतर योग्यवेळी उपचार न भेटल्याने लहान मुलांचा किंवा आजारी प्रौढ व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो.

The most poisonous scorpion : अरेबियन फॅट-टेल्ड स्कॉर्पियन (अँड्रोक्टोनस क्रॅसिकाउडा)

या विंचवाची प्रजाती सामान्यतः सौदी अरेबिया, कुवेत, कतार, इराक, इराण, तुर्की आणि उत्तर आफ्रिकन राष्ट्रांमध्ये आढळते.

या अरेबियन फॅट-टेल्ड डंकाने बाधित व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू शकतो, तसेच बाधित व्यक्ती बेशुद्ध देखील पडू शकतो.

जर सात ते आठ तासांच्या आत व्यक्तीला उपचार नाही भेटला तर त्या व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो.

या विचंवाच्या डंखाने लहान मुले व हृदय विकाराने त्रस्त असणारे लोक जास्त प्रभावित होतात.

एकंदरीत, या विंचूनव्यतिरिक्त जगात जवळपास 2000 विंचवांच्या जाती आहेत. त्यापैकी 30 ते 40 जाती या विषारी आहेत,

ज्यांमध्ये माणसांना मारण्याइतके विष असते. या विचवांच्या जाती प्रामुख्याने उष्ण कटिबंध प्रदेशात आढळत. विंचू देखील प्राणघातक ठरू शकतो.

त्यामुळे विंचू चावल्यामुळे कोणत्या मांत्रिकाकडे जाण्याऐवजी प्रथोमपचारासाठी डॉक्टरांकडे जावे.







Subscribe Now

    Subscribe to our mailing list to receives daily updates direct to your inbox!

    Related Articles

    Global Health Issues
    GKHealthLifestyle

    Global Health Issues : जागतिक आरोग्य समस्या, ज्यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते

    Global Health Issues : अलिकडच्या वर्षांत जगाला अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा...