Government Job : कोरोना काळापासून सुरु झालेली मंदीची लाट अद्यापही सुरूच आहे. या मंदी सदृश्य परस्थितीमुळे अनेक छोट्या मोठ्या कंपन्यांच्या प्रगतीला ग्रहण लागलं आहे. एवढाच नाहीतर अनेक मोठ्या कंपन्या तोट्यामध्ये आहेत तर अनेक कंपन्यांच्या नफ्यात घट झाली आहे. परिणामी बहुतांश कंपन्यांनी खर्च कमी करण्यासाठी नोकर कपातीसारखा मोठा निर्णय घेतला आहे, आणि तसं झालंही. मागील काही काळापासून नोकर कपातीमध्ये वाढ झाली आहे. कंपन्यांनी चांगल्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. आता नोकरी गमावलेल्या व शिक्षित प्रतिभावान तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची संधी आहे.
Government Job : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरती होणार –
स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच एसएससी (SSC) अंतर्गत जवळपास 1 हजार 600 रिक्त पदे भरली जाणार आहे. एसएससी (SSC) अंतर्गत कोणत्या विभागाची पदे भरली जाणार? शैक्षणिक पात्रता काय? या भरती संबंधी संपूर्ण माहिती खालील प्रमाणे –
हे वाचा: Forest Recruitment 2023 : महाराष्ट्र वन विभागात 2 हजाराहून अधिक जागांवर भरती सुरु
Government Job : पदाचे नाव आणि पदसंख्या
1) कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
2) डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
3) डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’
एकूण जागा : 1 हजार 600
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण.
हे वाचा: IBPS Recruitment 2023 : IBPS मार्फत 8 हजारांपेक्षा अधिक जागांवर भरती होणार; अर्ज कसा करायचा? पहा.
वयाची अट :
या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 27 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीय उमेदवारांना वयात 5 वर्षे तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण : भारतात कुठेही
अर्ज कसा आणि कुठे करायचा?
हे वाचा: NABARD Recruitment : ग्रॅज्युएट आहात? मिळेल लाखाच्या घरात पगार
जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
Government Job : महत्वाच्या तारखा
वरील भरती प्रक्रियेत अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 08 जून 2023 पर्यंत असणार आहे.
या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.