RBI Nagar Urban Bank : भारतीय रिझर्व्ह बॅंक (RBI) ने अहमदनगर शहरातील सर्वात माेठी आणि गेल्या काही दिवसांपासून गैरव्यवहारांच्या प्रकरणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेली नगर अर्बन बॅंकेला (Nagar Urban Bank) दणका दिला आहे.
RBI Nagar Urban : RBI कडून नगर अर्बन बॅंकेचा परवाना रद्द
नगर अर्बन काे- ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेडचा (Nagar Urban Co-Operative Bank Ltd) महाराष्ट्राचा परवाना RBIने रद्द केला आहे. हा आदेश RBI आज 4 ऑक्टाेबरला काढला आहे. भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाचे अतिरीक्त सचिव आणि केंद्रीय निबंधक यांना बॅंक बंद करणे आणि बॅंकेसाठी लिक्विडेटर नियुक्त करण्याची सूचना केली आहे.
हे वाचा: Contract Recruitment : शासकीय पदांवर भरती
RBI Nagar Urban : नेमकं प्रकरण काय?
RBI ने नगर अर्बन बॅंकेचा (RBI Nagar Urban) परवाना रद्द करताना काही कारणे दिली आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईच्या शक्यता नाहीत. यामुळे, बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 56 सह वाचलेल्या कलम 11(1) आणि कलम 22 (3) (d) च्या तरतुदींचे ते पालन करत नाही. बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 56 मधील तरतुदींनुसार, तसेच बँक कलम 22(3) (a), 22 (3) (b), 22(3)(c), 22(3) (d) आणि 22(3)(e) च्या आवश्यकतांचे पालन करण्यात अयशस्वी ठरली आहे.
RBI ने बँकेचे चालू ठेवणे तिच्या ठेवीदारांच्या हितासाठी प्रतिकूल आहे का, यावर देखील भाष्य केले आहे. बॅंकेची सध्याची आर्थिक स्थिती असलेली बँक तिच्या सध्याच्या ठेवीदारांना पूर्ण पैसे देऊ शकणार नाही. बँकेला बँकिंग व्यवसाय चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास सार्वजनिक हितावर प्रतिकूल परिणाम होईल, असे म्हटले आहे.
RBI ने बँकेने हाकलून दिलेले आणि बँकेत परत येवू नका, म्हणून सांगितलेल्या संचालकांनी RBI बँकेचा अवमान करून परत बँकेत आले, ही सर्वात मोठी घोडचुक ठरली. 15 एप्रिल 2023 चे विशेष सर्वसाधारण सभेत यांनी सन्मानाने राजीनामे द्यायला पाहिजे हाेते.
उच्च न्यायालयात RBIला खोटे ठरविणेचा डाव केला. ही आणखी माेठी चूक नडली. 22 जुलै 2022 ची बँक बंद का करू नये, ही नोटीस आल्यानंतर देखील संचालकांचे डाेळे उघडले नाही. बँक बंद करायचा निश्चय केल्यासारखे संचालक वागत हाेते, या प्रवृत्तीचा निषेध करताे, अशी प्रतिक्रिया नगर अर्बन बॅंक बचाव समितीचे राजेंद्र गांधी यांनी दिली आहे.