Railway Recruitment 2023 : सध्या नोकरी मिळणे खूप अवघड झालं आहे. अगदी शिपाई पदासाठी उच्चशिक्षित तरुणांचे अर्ज दाखल होत आहेत. यावरूनच समजते की नोकरी मिळणे सध्याच्या काळात एवढं सोप्प राहिलेलं नाही. त्यात आर्थिक मंदीची भर पडली आहे. आर्थिक मंदीमुळे अनेक मोठ्या कंपन्यांनी खर्च कमी करण्यासाठी कामगारांना नोकरीवरून काढून टाकलं आहे. एवढं सगळं असताना सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात अनेक ठिकाणी कौशल्यवान आणि होतकरू तरुणांसाठी नोकरीच्या संधी असतात. सध्या अशाच होतकरू तरुणांना रेल्वेने नोकरी करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. रेल्वेने याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करून माहिती दिली आहे.
Railway Recruitment 2023 : रेल्वेत ‘या’ पदाच्या एक हजाराहून अधिक जागांसाठी भरती सुरु
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने ‘अप्रेंटिस’ पदाच्या तब्बल एक हजारांहून अधिक जागा भरण्यासंबंधितची एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये आयटीआय झालेले तरुण अर्ज करू शकतात. तसेच शैक्षणिक पात्रता फक्त दहावी उत्तीर्ण एवढी आहे. ही भरती प्रक्रिया कशी राबविण्यात येणार आहे? याबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे…
Railway Recruitment 2023 : भरतीबाबतची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे –
या भरती प्रक्रियेमध्ये भाग कसा द्यायचा? पदांनुसार नेमकी पात्रता काय आहे? अर्ज कसा आणि कुठे करायचा? याबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
एकूण जागा : 1033 जागा
हे वाचा: Talathi Bharti 2023 : 4 हजारांहून अधिक जागांसाठी तलाठी भरती सुरु; असा करा अर्ज.
शैक्षणिक पात्रता :
या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेड मध्ये ITI पूर्ण झालेला असणं गरजेचं आहे.
वयोमर्यादा :
या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष 01 जुलै 2023 रोजी 15 ते 24 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. SC आणि ST या प्रवर्गातील उमेदवारांना वयात 5 वर्षे सूट असणार आहे तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयात 3 वर्षे सूट दिली जाणार आहे.
हे वाचा: Government Job Recruitment : भारतीय नौदलात भरती सुरु; महिलांसाठीही राखीव जागा : असा करा अर्ज.
नोकरी ठिकाण : रायपूर विभाग
शुल्क : या भरती प्रक्रियेत अर्ज दाखल करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.
Railway Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पहा.
जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा.
ऑनलाईन अर्ज – येथे करा
Railway Recruitment 2023 : महत्वाच्या तारखा
वरील भरती प्रक्रियेत 22 जून 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. तसेच परीक्षा कधी आहे? याची तारीख नंतर कळविण्यात येणार आहे.
या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.