Friday , 29 September 2023
Home Jobs Talathi Bharti 2023 : 4 हजारांहून अधिक जागांसाठी तलाठी भरती सुरु; असा करा अर्ज.
Jobs

Talathi Bharti 2023 : 4 हजारांहून अधिक जागांसाठी तलाठी भरती सुरु; असा करा अर्ज.

Talathi Bharti 2023 : तलाठी भरती सुरु; असा करा अर्ज.
Talathi Bharti 2023 : Letstalk

Talathi Bharti 2023 : बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित तलाठी भरती अखेर सुरु झाली आहे. बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ही भरती महाराष्ट्र शासनाने तलाठी भरतीसाठी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानुसार राज्यातील विविध जिल्ह्यांच्या तब्बल 4 हजार 644 जागांसाठी ही तलाठी भरती राबविण्यात येणार आहे.

Talathi Bharti 2023 : तलाठी भरती सुरु; असा करा अर्ज.

हे वाचा: NHPC Recruitment 2023 : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये भरती सुरु, 'असा' करा अर्ज

कोण कोणत्या जिल्ह्यात होणार भरती :

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमधील तलाठ्यांची रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, पुणे, पुणे रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ आणि पालघर या जिल्ह्यांचा सर्वसमावेश आहे. तसेच या भरती साठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे.

Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीबाबत संपूर्ण माहिती

तलाठी भरती महाराष्ट्राच्या महसूल विभागामार्फत होणार आहे. तसेच ह्या भरतीमध्ये भाग घेण्यासाठी कोणत्याही क्षेत्राची पदवी असणे आवश्यक आहे. तर या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.

तलाठी भरती 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्जप्रक्रिया

पदाचे नाव आणि पदसंख्या –

हे वाचा: Central Bank of India Recruitment 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मोठी भरती सुरु; असा करा अर्ज.

पदाचे नाव : तलाठी (गट-क)

पदसंख्या : जिल्हानिहाय पदसंख्या खालीलप्रमाणे

अ.क्र. जिल्हा पद संख्या अ.क्र. जिल्हा पद संख्या
1 अहमदनगर 250 19 नागपूर 177
2 अकोला 41 20 नांदेड 119
3 अमरावती 56 21 नंदुरबार 54
4 औरंगाबाद 161 22 नाशिक 268
5 बीड 187 23 उस्मानाबाद 110
6 भंडारा 67 24 परभणी 105
7 बुलढाणा 49 25 पुणे 383
8 चंद्रपूर 167 26 रायगड 241
9 धुळे 205 27 रत्नागिरी 185
10 गडचिरोली 158 28 सांगली 98
11 गोंदिया 60 29 सातारा 153
12 हिंगोली 76 30 सिंधुदुर्ग 143
13 जालना 118 31 सोलापूर 197
14 जळगाव 208 32 ठाणे 65
15 कोल्हापूर 56 33 वर्धा 78
16 लातूर 63 34 वाशिम 19
17 मुंबई उपनगर 43 35 यवतमाळ 123
18 मुंबई शहर 19 36 पालघर 142

एकूण जागा : 4 हजार 644

हे वाचा: SSC CPO Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती सुरु.

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट :

या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष 17 जुलै 2023 पर्यंत सरासरी 18 ते 38 वर्षे0 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. तर मागासवर्गीय उमेदवारांना वयात 5 वर्षे सूट असणार आहे.

शुल्क :

खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये शुल्क असणार आहे तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 900 रुपये शुल्क असणार आहे.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

Talathi Bharti 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अधिकृत वेबसाईट – येथे पहा 

जाहिरात (Notification) – तलाठी भरती संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा 

ऑनलाईन अर्ज – येथे Click करा. 

महत्वाच्या तारखा

या भरती प्रक्रियेत भाग घेण्यासाठी तुम्हाला 17 जुलै 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यानंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे अर्ज वेळेआधीच भरले तर फायद्याचं ठरणार आहे. तसेच या भरती प्रकियेबाबत काही अडचण आल्यास तुम्ही अधिक माहितीसाठी वरील जाहिरात पाहू शकता.

Related Articles

RBI Assistant Recruitment 2023
Jobs

RBI Assistant Recruitment 2023 : भारतीय रिझर्व्ह बँकेत भरती सुरु, Apply Here

RBI Assistant Recruitment 2023 : भारताची मध्यवर्ती बँक (Central Bank) म्हणजेच भारतीय...

Nashik Police Patil Bharti 2023
Jobs

Nashik Police Patil Bharti 2023 : नाशिक जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांसाठी भरती सुरु

Nashik Police Patil Bharti 2023 : नाशिक जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये पोलीस पाटील’...

CPCB Recruitment 2023
Jobs

CPCB Recruitment 2023 : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात भरती सुरु; असा करा अर्ज

CPCB Recruitment 2023 : जर तुम्ही पर्यावरण इंजिनिअरिंग विषयक पदवी घेतलेली असेल...

DTP Maharashtra Recruitment 2023
Jobs

DTP Maharashtra Recruitment 2023 : दहावी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरी करण्याची संधी; असा करा अर्ज

DTP Maharashtra Recruitment 2023 : दहावी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरी करण्याची मोठी...