Saturday , 30 September 2023
Home Lifestyle Profitable Business ideas for women : गुंतवणूक कमी आणि व्यवसायाची हमी – गृहिणींनो घरबसल्या करा जोरदार व्यवसाय
Lifestyle

Profitable Business ideas for women : गुंतवणूक कमी आणि व्यवसायाची हमी – गृहिणींनो घरबसल्या करा जोरदार व्यवसाय

Profitable Business ideas for women
Profitable Business ideas for women : Letstalk

Profitable Business ideas for women : काहीतरी काम सातत्याने करत राहिले पाहिजे. कमाई करत राहणे हे प्रत्येकाने स्वीकारणे आवश्यक आहे. गुंतवणूक कमी आणि व्यवसायाची हमी अश्या गटात मोडणारे काही घरी करता येणारे व्यवसाय नक्कीच स्वप्नं पूर्ण करण्यात हातभार लावतील. आजकाल घरी बसून राहणाऱ्या स्त्रिया आढळत नाहीत. काही ना काही करत राहण्याची वृत्ती आताशा स्त्रियांमध्ये निर्माण झालेली दिसते.

ज्यांना पार्ट टाइम काम करायची इच्छा आहे, घरबसल्या काही उद्योग करू इच्छितात अश्या स्त्रियांसाठी काही उपयुक्त असे व्यवसाय खाली दिलेले आहेत.

हे वाचा: World No Tobacco Day : आज जागतिक तंबाखू विरोधी दिन.

Profitable Business ideas for women
Profitable Business ideas for women : Letstalk

Profitable Business ideas for women : केटरिंग फ्रॉम होम – खानपान व्यवसाय :

तुम्हाला स्वयंपाक करायला, इतरांना नवनवीन चवदार खिलवायला अडवत असल्यास, आपण छोट्या समारंभासाठी केटरिंग सर्व्हिस सुरू करू शकता. तुमच्या शेजारी किंवा सोसायटीमधल्या किंवा कॉलनीतल्या लोकांना एखादी छोटी पार्टी देऊन छोटीशी सुरुवात करू शकता. लोकांना एकत्र आणून आपल्या व्यवसायाची माहिती द्या आणि सोबत काही लझीझ पदार्थांची चव चाखायला द्या. हळूहळू व्यवसाय असाच विस्तारत जाईल.

Profitable Business ideas for women : होम बेकर बना-घरगुती बेकरी सुरु करा :

कोविड काळात अनेकांनी घरच्याघरी केक केले. पण आता थोडं सिरियसली विचार करून आपण काही विशिष्ठ रक्कम गुंतवणूक करून घरीच एक छोटी बेकरी सुरु करू शकता. घरगुती पद्धतीने केलेले पण स्वच्छता पाळून केलेले म्हणजे हायजिन प्रकारात मोडणारे पदार्थ आपण करून विकू शकता. केक, ब्रेड, बिस्किटे, लादीपाव, पॅटिस, पिझ्झा अश्या पदार्थाना नेहमीच मागणी असते. थोडं आसपास मार्केटिंग केले आणि हायजिन पदार्थ एकदा लोकांना आवडायला लागले की तुमच्या बिझनेसच्या मागणीत आपोआप वाढ होईल.

हेही वाचा : चलन कोण तयार करतं? जाणून घ्या संपूर्ण माहिती 

हे वाचा: Top 10 Cosmetic Brands in India : 2023 मध्ये भारतातील टॉप ट्रेंडिंग Cosmetic Brands कोणते?

Profitable Business ideas for women : ट्युशन्स किंवा ऑनलाइन शिकवणी :

एखाद्या विषयाचे तुमच्याकडे एक्सपर्टीज म्हणजे प्राविण्य असल्यास त्या विषयासंदर्भात विशिष्ठ अशी शिकवणी म्हणजे ट्युशन्स तुम्ही घेऊ शकता. एखादी भाषा, एखादी कला, एखादे कौशल्य ज्याला सध्याच्या स्पर्धात्मक युगात जास्त मागणी आहे अश्या विषयाला अनुसरून आपण ट्युशन्स घेतल्यास त्याला जास्त डिमांड येऊ शकते. अगदी स्वयंपाक कसा करायचा, भाषण कसे करायचे वगैरे गोष्टींवर सुद्धा आजकाल ट्युशन्सना मागणी आहे.

Profitable Business ideas for women : स्वतंत्र लेखन किंवा संपादन :

तुम्ही भरपूर वाचत असाल आणि तुम्हाला लिखाणाचे अंग असेल तर तुमच्यासाठी हे चांगले असे क्षेत्र बनू शकते. जाहिरात एजन्सी, वर्तमानपत्रे, विविध ऑनलाईन पोर्टल्स, विविध कार्यालये ह्यांना नियमित पातळीवर लेख लिहून देणारे, कॉपीरायटिंग करणारे, ब्लॉगिंग करणारे, पुस्तके, मासिके लिहिणारी माणसे हवीच असतात. लिहिलेल्या कन्टेन्टचे संपादन करणे हा पण एक मोठा विषय आहे. त्यात पण कामाची मोठी संधी आहे. लिहणारे हात कमी होत चालले आहेत, तंत्रज्ञानाच्या वाढत्या स्पीडमध्ये शुद्ध आणि सुयोग्य लिहिणारी माणसे हवीच असतात.

Profitable Business ideas for women : ऑनलाईन मार्केटिंग :

कमी गुंतवणूक आणि सोशल मीडियाचा सुयोग्य वापर करून तुम्ही कपडे, गिफ्ट आर्टिकल्स, दागिने अश्या अनेक वस्तू विकू शकता. त्यासाठी फेसबुक, whatsapp, इंस्टाग्राम, युट्युब अश्या सोशल मीडिया साईट्सचा वापर करून ग्राहकांना आकर्षित करू शकता. अफिलिएट मार्केटिंग सारखा प्रकार अवलंबून तुम्ही तुमच्या नेटवर्कमध्ये सर्व्हिसेस, प्रॉडक्ट्स विकून पैसे मिळवू शकता.

हे वाचा: How To Avoid Food Poisoning : पावसाळयात फूड पॉयझनिंग टाळण्यासाठी कोणती खबरदारी घेतली पाहिजे?

अर्धवेळ घरबसल्या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी वाट पाहायची गरज नाही. इथं मांडलेल्या या काही कल्पना तुम्हाला प्रोत्साहन देत असतील तर आजच सुरुवात करा. थोडी क्रिएटिव्हिटी आणि जरा मेहनत घेऊन तुम्ही घरबसल्या यशस्वी व्यवसाय सुरू करू शकता.

Profitable Business ideas for women : अर्धवेळ घरबसल्या व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी काही टिप्स :
  1. सर्वात प्रथम आपण किती वेळ देऊ शकतो ह्याचा विचार करावा.
  2. कोणते उत्पादन विकता येईल ह्याचाही आपला विचार व्हायला हवा. त्यावर तुमचे संशोधन करा.
  3. आपण कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी, आपले संशोधन करणे आणि आपल्या उत्पादनासाठी किंवा सेवेसाठी बाजारपेठ योग्य आहे ना याची खात्री करणे महत्वाचे आहे.
  4. व्यवसाय योजना तयार करा.
  5. तुमच्या व्यवसायाचे मार्केटिंग जोरदार करा.
  6. मुख्य म्हणजे धीर धरा. व्यवसाय यशस्वी होण्यासाठी वेळ लागतो.

आजच्या ह्या फास्ट आणि खर्चिक जगात थोडी का होईना कमाई दर महिन्याला होत असेल तर आपली स्वप्ने पूर्ण करण्यात हात भार लागतो.

Related Articles

6 Budget Friendly Furniture Ideas
Lifestyle

6 Budget Friendly Furniture Ideas : बजेट फ्रेंडली फर्निचर आयडिया.

6 Budget Friendly Furniture Ideas : फर्निचर ही आजच्या युगात एकदम गरजेची...

Budget friendly Creative Balcony Decor Ideas
Lifestyle

Budget friendly Creative Balcony Decor Ideas : तुमची बाल्कनी सजवण्यासाठी काही बजेट फ्रेंडली टिप्स.

Budget friendly Creative Balcony Decor Ideas : आजकाल उंचच उंच बिल्डिंग मध्ये...

Which Fridge should you Buy?
LifestyleTech

Which Fridge should you Buy? : फ्रिज घेताय? कोणता फ्रिज घ्यावा?

Which Fridge should you Buy? : रेफ्रिजरेटर, ज्याला बर्‍याचदा फ्रीज म्हणून संबोधले...