Saturday , 30 September 2023
Home Tech Swaraj Target 630 : ट्रॅक्टर घ्यायचाय? कमी किमतीतला हा टॅक्टर आहे सगळ्यात भारी.
Tech

Swaraj Target 630 : ट्रॅक्टर घ्यायचाय? कमी किमतीतला हा टॅक्टर आहे सगळ्यात भारी.

Swaraj Target 630
Swaraj Target 630 : Letstalk

Swaraj Target 630 : कृषिप्रधान राष्ट्र म्हणून भारत आजवर ओळखला जातो आहे. पण आता कृषी क्षेत्रातील उपकरणांबाबतही आपण स्वयंपूर्ण आणि सक्षम बनत आहोत. आपल्या देशातली सध्या आघाडीवर असणारी ट्रॅक्टर कंपनी स्वराज, ह्यांनी मिनी आणि वजनाने हलक्या अश्या ट्रॅक्टरला लाँच केले आहे. स्वराज टार्गेट 630 हा 29 hp क्षमतेचा ट्रॅक्टर आहे. हा एक कॉम्पॅक्ट आणि हलका ट्रॅक्टर आहे, जो नांगरणी, लागवड, कापणी आणि वाहतूक यासह विविध कृषी ऑपरेशन्समध्ये यशस्वी वापरण्यासाठी डिझाइन केलेला आहे.

Swaraj Target 630
Swaraj Target 630 : Letstalk

Swaraj Target 630 : ‘या’ शेतकऱ्यांसाठी उपयुक्त

छोटा ट्रॅक्टर असल्याने काही कामे पटकन हातावेगळी होतात. अल्पभूधारक शेतकऱ्यांना लागणार वेळ वाचतो आणि कामेही पटापट होतात. आधुनिक शेतीसाठी उपयुक्त असे फीचर्स ह्या अनोख्या Swaraj Target 630 मध्ये आहेत.

हे वाचा: Online Betting Sites : ऑनलाइन सट्टेबाजी साइट आणि साधक-बाधक माहिती.

Swaraj Target 630 : ट्रॅक्टरची खासियत काय?

स्वराज टार्गेट 630 हा ट्रॅक्टर 3-सिलेंडरचा, 1331cc डिझेल इंजिन असलेला आहे. 2800 rpm वर 29 hp इतकी शक्ती निर्माण करणारा हा ट्रॅक्टर आहे. इंजिनला 9 फॉरवर्ड आणि 3 रिव्हर्स गियर असून ट्रॅक्टरचा सर्वाधिक वेग २४ किमी प्रतितास इतका कंपनीने दिलेला आहे.

हेही वाचा : सुरक्षित आर्थिक भविष्यासाठी टॉप फायनान्स टिप्स; जाणून घ्या सविस्तर माहिती 

स्वराज टार्गेट 630 मध्ये असणारी अनेक अशी वैशिष्ट्ये त्याला एक ऍग्रो-फ्रेंडली आणि कार्यक्षम ट्रॅक्टर बनवतात.

हे वाचा: Photos of the Week: Hunter’s Moon, Space Fingerprint

Swaraj Target 630 : स्वराज टार्गेट 630 ची वैशिठ्ये –

बॅलन्स्ड पॉवर स्टीयरिंग प्रणाली – अचूक आणि सुलभ नियंत्रणासाठी.

अवजारांच्या विस्तृत श्रेणीसाठी विविध PTO गती (540 आणि 540E).

BS-VI उत्सर्जन मानके पूर्ण करणारे इंधन-कार्यक्षम इंजिन.

हे वाचा: Amazon Prime Day Sale : उद्यापासून ॲमेझॉन Prime Day सेल सुरु; मोबाईल्स पासून घरगुती वस्तूंवर मिळणार मोठा डिस्काउंट

स्वराज टार्गेट 630 लाल, हिरवा आणि पिवळा यासह विविध रंगांमध्ये उपलब्ध आहे.

पॉवर : 2800 आरपीएम वर 29 एचपी.

थ्री-पॉइंट हिच लिफ्ट क्षमता : 980 किलो.

इंधन टाकीची क्षमता : 27 लिटर.

वॉरंटी : 2 वर्षे.

स्वराज टार्गेट 630 ची भारतात असलेली किंमत ₹5.35 लाख (एक्स-शोरूम) च्या आसपास आहे. जे शेतकरी कॉम्पॅक्ट आणि मल्टीटास्किंग ट्रॅक्टरच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. लोकप्रिय, इंधन-कार्यक्षम आणि विश्वासार्ह ट्रॅक्टर म्हणून स्वराज टार्गेट 630 कडे शेतकी जग पाहत आहे.

Related Articles

Which Fridge should you Buy?
LifestyleTech

Which Fridge should you Buy? : फ्रिज घेताय? कोणता फ्रिज घ्यावा?

Which Fridge should you Buy? : रेफ्रिजरेटर, ज्याला बर्‍याचदा फ्रीज म्हणून संबोधले...

iphone 15
Techघडामोडी

iPhone15 – नवीन आयफोन आला आयफोन आला आयफोन आला

iPhone15 – नवीन आयफोन आला आयफोन आला आयफोन आला काल iphone15 लाँच...

UPI, PayTM, GPay, PhonePe
Tech

Digital Payment System : UPIद्वारे पैसे देताय ??

Digital Payment System : UPIद्वारे पैसे देताय ?? PhonePay, G-Pay, PayTM असे...

Top 5 Microwave Brands in India
LifestyleTech

Top 5 Microwave Brands in India : मायक्रोवेव्ह वापरण्याचे फायदे कोणते? भारतातील टॉप 5 Microwave ब्रँड्स कोणते?

Top 5 Microwave Brands in India : मायक्रोवेव्ह ओव्हन हे स्वयंपाकघरातील असे...