Thursday , 16 January 2025
Home Uncategorized Maharashtrian Breakfast : सकाळच्या पारी न्याहरी लै भारी … आपल्या महाराष्ट्रातील काही लोकप्रिय नाश्त्याचे प्रकार.
Uncategorized

Maharashtrian Breakfast : सकाळच्या पारी न्याहरी लै भारी … आपल्या महाराष्ट्रातील काही लोकप्रिय नाश्त्याचे प्रकार.

Maharashtrian Breakfast :letstalk

Maharashtrian Breakfast : पुढारलेले राज्य असले तरी इथल्या मूळ पदार्थांची चव मातीत रुजलेली आहे. विविध ठिकाणाहून लोकं महाराष्ट्रात येऊन वसलेले असले तरी बाकी पदार्थांबरोबरच अस्सल मराठी पदार्थ जास्त लोकप्रिय आहेत.

Maharashtrian Breakfast :letstalk

आपल्या महाराष्ट्रातील काही लोकप्रिय नाश्त्याचे प्रकार –

पोहे :

कांदे पोहे ही महाराष्ट्रातील एक लोकप्रिय न्याहरी. करायला सोपी आणि झटपट होणारी असल्याने घरटी ही डिश नेहमी होत असते. मस्त फोडणीत तळलेले शेंगदाणे, खरपूस परतलेला कांदा, कोथिंबीर आणि लिंबू पिळलेली पोह्यांची डिश ही चटकन फस्त होते. काही शहरात तर्री पोहे, सांबर पोहे खायची पद्धत रूढ झाली आहे.

हे वाचा: जिओच्या 'या' डिव्हाईससह टीव्हीवर सर्व काही फ्री पाहता येईल, सिमची आवश्यकता नाही!

मिसळ पाव :

अस्सल महाराष्ट्रीयन अशी ओळख असलेल्या पदार्थात मिसळीचे नाव आघाडीवर आहे. मोड आलेली मटकीची उसळ, फरसाण, शेव, बारीक चिरलेला कांदा, लिंबू आणि वरून मस्त झणझणीत तर्री असलेला रस्सा सोबत जोडीला पाव अहाहाहाहा. गल्लीतल्या टपरीपासून मोठ्या हॉटेलात सुद्धा मिळणार हा पदार्थ जागतिक पातळीवर फेमस झालेला आहे.

हेही वाचा : Down Payment and Savings Planning : घरासाठी डाऊन पेमेंट अन बचतीचे नियोजन.

साबुदाणा खिचडी :

साबुदाणा खिचडी हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय नाश्ता आहे. विशेषत: उपवासाच्या काळात खिचडीला मागणी असते. खरपूस भाजलेल्या अर्धवट भरडलेल्या शेंगदाण्याचा कूट, हिरव्या मिरच्या, उकलडलेल्या बटाट्याच्या काचऱ्या आणि मस्त भिजवून फुललेला साबुदाणा ह्यांच्या झकास मिश्रणाने साबुदाणा खिचडी तयार करतात.

थालीपीठ :

थालीपीठ हे ज्वारी, बाजरी आणि भाजणी पीठ यांसारख्या पिठांच्या मिश्रणाने करतात. सोबत कांदा, मेथी हिरव्या मिरच्या त्यात घालून मस्त खरपूस भाजून भरपूर तूप, लोणी सोबत खायला देतात. दह्यासोबत पण थालीपीठ भन्नाट लागते. काही ठिकाणी मिश्र पिठाचे धपाटे पण करतात आणि सोबत ठेचा आणि लोणचे असतेच.

हे वाचा: 1 मार्चपासून नक्की कोणते 5 नियम बदलणार? जाणून घ्या सविस्तर…

वडा पाव :

तळलेल्या हिरव्या मिरचीसोबत, पावाला आतून लावलेली चिंचेची चटणी आणि सोबत तोंडी लावायला खोबऱ्याची लसूण घातलेली चटणी आणि झकास उकडलेल्या बटाट्यात, मिरची, आले, लसूण, कोथिंबीर आणि मसाल्यानी एकजीव केलेल्या सारणाचा गोळा डाळीच्या पिठात छान घोळवून खरपूस तळलेला वडा म्हणजे निव्वळ स्वर्गीय सुख. लहान मोठे, गरीब श्रीमंत सर्वाना आवडणारा असा हा पदार्थ आहे.

शिरा :

शिरा हा उत्तम गुलाबी भाजलेल्या रव्याचा असतो. साखर आणि वेलची पूड घालून मस्त शिजलेला शिरा नाश्त्यात वेगळीच रंगत आणतो. पूजेच्या दिवशी प्रसादासाठी केला जाणाऱ्या शिऱ्यात केळी घालतात, तर काही ठिकाणी पायनॅपल शिरा पण करतात. आंब्याच्या काळात मँगो शिरा केला जातो. नाश्त्यात तसं शिरा सोडून दुसरे काही गोड मराठी माणूस खात नाही.

करा रोज न्याहरी काळजी घेईल श्रीहरी

हे वाचा: Highest Salaried job in India : भारतात 'या' नोकऱ्यांना लाखांमध्ये पगार, पाहा यादी!

Related Articles

Uncategorized

Diwali Ank 2024: आकर्षक कथा आणि प्रेरणादायक लेखांचा संग्रह!

Diwali ank 2024 | दिवाळी अंक 2024: मराठी साहित्याचा उत्सव दिवाळी म्हणजे...

SSC GD Constable Recruitment 2024
Uncategorized

SSC GD Constable Recruitment 2024 : SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 26 हजार 146 जागांसाठी मेगा भरती सुरु; असा करा अर्ज

SSC GD Constable Recruitment 2024 : तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी...

G20-SUMMIT-2023
Uncategorized

G20 Summit 2023 : G20 परिषद

G20 Summit 2023 – आजपासून दिल्लीत G20 परिषद सुरु झाली. कोण कोणते...

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana
Uncategorized

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना.

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana ; पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना...