Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 : इंजिनिअर झालेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत विविध पदांच्या अनेक जागांसाठी भरती (Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023) प्रक्रिया सुरु झाली आहे. ह्यात विविध शाखांमध्ये इंजिनिअरची पदवी पास असणाऱ्या तरुणांसाठी सर्वाधिक जागा असणार आहेत. तसेच अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. जाणून घेऊयात..
Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत भरती सुरु
हे वाचा: SBI Clerk Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदांच्या 8 हजार 283 जागांसाठी भरती सुरु.
महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत मोठी भरती (Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023) सुरु झालेली आहे. ह्यामध्ये अनेक महत्वाच्या 1 हजार 700 पेक्षा अधिक जागा भरण्यात येणार आहे. या भरती बाबतची अधिकृत जाहिरात महाराष्ट्र नगरपरिषद संचालनायाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. ह्या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? अनुभव लागतो की नाही? पदांचे नाव काय आहे? पदसंख्या किती आहे? सर्वात महत्वाचं ऑनलाईन अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घेऊयात याबाबतची संपूर्ण माहिती.
Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 : जाणून घ्या अर्ज प्रक्रिया –
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता | परीक्षा |
1 | स्थापत्य अभियंता, गट-क | 291 | 1) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
2) MS-CIT किंवा समतुल्य |
महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) |
2 | विद्युत अभियंता, गट-क | 48 | 1) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी हे वाचा: IBPS PO Recruitment 2023 : IBPS मार्फत 3 हजारांपेक्षा अधिक जागांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करायचा? 2) MS-CIT किंवा समतुल्य |
महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत) |
3 | संगणक अभियंता,गट-क | 45 | 1) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
2) MS-CIT किंवा समतुल्य |
महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (संगणक) |
4 | पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट-क | 65 | 1) मेकॅनिकल/पर्यावरण इंजिनिअरिंग पदवी
2) MS-CIT किंवा समतुल्य |
महाराष्ट्र नगर परिषद पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा |
5 | लेखापरीक्षक/लेखापाल,गट-क | 247 | (1) B.Com हे वाचा: IB Recruitment 2023 : दहावी पास आहात? केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु; असा करा अर्ज 2) MS-CIT किंवा समतुल्य |
महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षण व लेखा विभाग |
6 | कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, गट-क | 579 | 1) कोणत्याही शाखेतील पदवी
2) MS-CIT किंवा समतुल्य |
महाराष्ट्र नगर परिषद प्रशासकीय सेवा व कर निर्धारण |
7 | अग्निशमन अधिकारी, गट-क | 372 | 1) कोणत्याही शाखेतील पदवी
2) अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम नागपूरमधून उत्तीर्ण किंवा उपस्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम उत्तीर्ण 3) MS-CIT किंवा समतुल्य |
महाराष्ट्र नगर परिषद अग्निशमन सेवा |
8 | स्वच्छता निरीक्षक, गट-क | 35 | 1) कोणत्याही शाखेतील पदवी
2) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा |
महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा |
Total | 1782 |
वयोमर्यादा –
या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष 20 ऑगस्ट 2023 पर्यंत सरासरी 21 ते 38 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच यामध्ये मागासवर्गीयांना म्हणजेच SC आणि ST या प्रवर्गातील उमेदवारांना आणि अनाथ उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षांची सूट असणार आहे. तर इतर प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये कोणतीही सूट नाही.
शुल्क :
या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जनरल, ओबीसी आणि ईडब्लूएस या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये (₹1000/-) शुल्क असणार आहे तर एससी, एसटी अशा मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना आणि अनाथ उमेदवारांना नऊशे रुपये (₹900/-) शुल्क असणार आहे.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही
Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पहा.
जाहिरात (Notification) – अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा.
ऑनलाईन अर्ज – येथे Click करा.
परीक्षेचे नाव –
महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा 2023
परीक्षेचा अभ्यासक्रम : येथे पाहा
Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 : महत्वाच्या तारखा –
या भरती प्रक्रियेत भाग घेण्यासाठी तुम्हाला 20 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तसेच परीक्षा कधी आणि कुठे असणार आहे. याची माहिती नंतर कळविण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेअंतर्गत सर्वात महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा ही घेण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्य परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड करण्यात येऊ शकते.
या भरती प्रकियेबाबत काही अडचण आल्यास तुम्ही अधिक माहितीसाठी वरील जाहिरात पाहू शकता.