अवघ्या थोड्या दिवसांच्या प्रतीक्षेनंतर वर्षाचा तिसरा महिना मार्च सुरू होईल. या महिन्यात होळीसह अनेक स्थानिक सणही येणार आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर त्याआधी बँकेच्या सुट्ट्यांची यादी तपासून घ्या, अन्यथा सुट्टीमुळे तुमचे काम होऊ शकले नाही, असे होईल.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून मिळालेल्या माहितीनुसार, मार्च 2023 मध्ये बँकांचे कामकाज 12 दिवस बंद राहिल. मात्र, 12 दिवसांच्या सुट्यांमध्ये दुसरा-चौथा शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. मार्च महिन्यात होळी हा मोठा सणही येणार आहे, त्यामुळे विविध राज्यांतील बँकांना सुमारे 3 दिवस सुट्टी असेल. अनेक स्थानिक सणांमुळे राज्यांमध्ये बँकाही बंद राहणार आहेत. वास्तविक, स्थानिक सुट्ट्या देखील आरबीआयच्या बँक हॉलिडे लिस्टमध्ये समाविष्ट आहेत. अशा परिस्थितीत तुमच्या भागात किती दिवस बँका बंद राहतील? यासाठी खाली दिलेली बँक सुट्टीची यादी पाहा…
हे वाचा: Rashi Bhavishya : 24 मार्च 2023 : आज तुमचा दिवस कसा राहिल? वाचा…
3 मार्च : चपचार कुट (आयझॉल – बँकेला सुट्टी)
5 मार्च : रविवार
7 मार्च : होलिका दहन (बेलापूर, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, कानपूर, लखनौ, मुंबई, नागपूर, पणजी आणि रांची येथे बँक बंद)
8 मार्च : होळीची सुट्टी
9 मार्च : होळीचा दुसरा दिवस (पाटणामध्ये सुट्टी)
11 मार्च : दुसरा शनिवार
१२ मार्च : रविवार
19 मार्च : रविवार
22 मार्च : गुढी पाडवा/उगादी सण/बिहार दिवस/साजिबू नोंगमापनबा (चीरोबा)/तेलुगु नववर्ष दिन (बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, इंफाळ, मुंबई, नागपूर, पणजी आणि पाटणा येथे बँक बंद)
25 मार्च : चौथा शनिवार
26 मार्च : रविवार
30 मार्च : श्री राम नवमी (अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, गंगटोक, हैदराबाद, जयपूर, कानपूर, लखनौ, मुंबई, नागपूर, पाटणा, रांची आणि शिमला येथे बँक सुट्टी)
हल्ली डिजिटलच्या काळात जवळपास देशातील बहुतांश बँका त्यांच्या ग्राहकांना ऑनलाईन सेवा ऑफर करतात. अशा परिस्थितीत, बँकेच्या सुट्टीच्या दिवशीही तुम्ही बहुतांश काम ऑनलाईन माध्यमातून करू शकता.
हे वाचा: Rashi Bhavishya : 16 मार्च 2023 : आज तुमचा दिवस कसा राहिल? वाचा…