ESIC Maharashtra Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. महाराष्ट्र सरकारच्या कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदांसाठी भरती सुरु झालेली आहे. ह्यासाठी कमीत कमी शिक्षण हे बारावी पास (विज्ञान शाखा) पर्यंत असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत कोणकोणते पद भरण्यात येणार आहे? कोणत्या पदासाठी किती वर्षांचा अनुभव असणे गरजेचं आहे? जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती.
ESIC Maharashtra Recruitment 2023 : कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती सुरु . . .
कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती सुरु झालेली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत विविध पदांच्या 71 जागांसाठी ही भरती होणार आहे या बाबतची अधिकृत जाहिरात कर्मचारी राज्य विमा महामंडळाने प्रसिद्ध केलेली आहे. ह्या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन करायचा आहे. तसेच तुम्ही 30 ऑक्टोबर 2023 या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. चला तर मग या भरतीमध्ये भाग घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कुठे आणि कसा करायचा? जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.
हे वाचा: IDBI Bank Recruitment 600 Posts : IDBI बँकेत भरती.
ESIC Maharashtra Recruitment 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्जप्रक्रिया . . .
पदांचा संपूर्ण तपशील खालीलप्रमाणे :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | वयाची अट
(30 ऑक्टोबर 2023 पर्यंत) |
1 | ECG टेक्निशियन | 03 | 1) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
2) ECG डिप्लोमा |
18 ते 25 वर्षे |
2 | जुनियर रेडिओग्राफर | 14 | 1) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
2) रेडिओग्राफी डिप्लोमा |
18 ते 25 वर्षे |
3 | जुनियर मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट | 21 | 1) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
2) MLT |
18 ते 25 वर्षे |
4 | मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट | 05 | 1) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण हे वाचा: IB Recruitment 2023 : केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु; असा करा अर्ज 2) मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन ट्रेनिंग |
18 ते 25 वर्षे |
5 | OT असिस्टंट | 13 | 1) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
2) O.T मध्ये एक वर्षाचा अनुभव |
18 ते 32 वर्षांपर्यंत |
6 | फार्मासिस्ट (अॅलोपॅथी) | 12 | B.Pharm किंवा 12वी उत्तीर्ण + D.Pharm | 18 ते 32 वर्षांपर्यंत |
7 | रेडिओग्राफर | 03 | 1) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
2) रेडिओग्राफी डिप्लोमा 3) 01 वर्ष अनुभव |
18 ते 25 वर्षे |
Total : 71 |
वयात सूट :
या भरती प्रक्रियेमध्ये एससी (SC) आणि एसटी (ST) या प्रवर्गाला वयामध्ये 05 वर्षांची सूट असणार आहे तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 03 वर्षांची सूट असणार आहे.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
शुल्क :
या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जनरल आणि ओबीसी (OBC) या प्रवर्गातील उमेदवारांना पाचशे रुपये (₹500/-) शुल्क असणार आहे तर SC, ST, PWD आणि ExSM या प्रवर्गातील उमेदवारांना आणि महिलांना दोनशे पन्नास रुपये (₹250/-) शुल्क असणार आहे.
ESIC Maharashtra Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पहा.
जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा.
ऑनलाईन अर्ज – येथे करा.
ESIC Maharashtra Recruitment 2023 : अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख –
वरील भरती प्रक्रियेत 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.