Chief Ministers of Indian States : प्रत्येक तालुक्या जिल्ह्यानंतर राज्यांचे राजकारण बदलत असते. याचाच परिणाम देशाच्या राजकारणावर आणि विकासावर होत असतो. देशाच्या किंवा राज्याच्या मुख्य पदावर कोण बसलं आहे किंवा राज्यात कोणत्या विचारांच्या नेतृत्वाची सत्ता आहे याचा देखील राज्याच्या विकासावर परिणाम होत असतो.
देशातील काही राज्यात सध्या अस्थिरतेचे वातावरण आहे तसेच काही राज्यांच्या निवडणूक तोंडावर आल्या आहेत, याच पार्श्वभूमीवर आपण कोणत्या राज्यात कोण मुख्यमंत्री (Chief Ministers of Indian States) आहे आणि तो कोणत्या पक्षाचा आहे याची माहिती पाहणार आहोत.
Chief Ministers of Indian States : राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष –
● महाराष्ट्र – एकनाथ शिंदे (शिवसेना)
● आंध्र प्रदेश – जगनमोहन रेड्डी (वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष)
● अरुणाचल प्रदेश – पेमा खांडू (भाजपा)
● आसाम – हिमंता बिस्वा सरमा (भाजपा)
● बिहार – नितीश कुमार (जनता दल)
● छत्तीसगड – भूपेश बघेल (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
● दिल्ली – अरविंद केजरीवाल (आम आदमी पक्ष)
● गोवा – प्रमोद सावंत (भाजपा)
● गुजरात – भूपेंद्रभाई पटेल (भाजपा)
● हरियाणा – मनोहरलाल खट्टर (भाजपा)
● हिमाचल प्रदेश – जयराम ठाकूर (भाजपा)
● झारखंड – हेमंत सोरेन (झारखंड मुक्ति मोर्चा)
● कर्नाटक – बसवराज बोम्मई (भाजपा)
● केरळ – पिनाराई विजयन (भारतीय कम्युनिस्ट पक्ष)
● मध्य प्रदेश – शिवराज सिंह चौहान (भाजपा)
● मणिपूर – नॉन्गथोम्बम बिरेन सिंह (भाजपा)
● मेघालय – कॉनराड संगमा (नॅशनल पीपल्स पार्टी)
● नागालँड – नेफिउ रिओ (शनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी)
● ओडिशा – नवीन पटनाय (बिजू जनता दल)
● पंजाब – भगवंत मान (आम आदमी पक्ष)
● राजस्थान – अशोक गेहलोत (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
● सिक्कीम – प्रेम सिंह तमांग (सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा)
● तामिळनाडू – एम.के. स्टॅलिन (द्रविड मुनेत्र कळघम)
● तेलंगणा – के. चंद्रशेखर राव (तेलंगणा राष्ट्र समिती)
● त्रिपुरा – माणिक साहा (भाजपा)
● उत्तर प्रदेश – योगी आदित्यनाथ (भाजपा)
● उत्तराखंड – पुष्कर सिंह धामी (भाजपा)
● पश्चिम बंगाल – ममता बॅनर्जी (तृणमुल काँग्रेस)
केंद्रशासित प्रदेश :
● पुद्दुचेरी – नादेसन रंगास्वामी (अखिल भारतीय एन.आर. काँग्रेस)
हे वाचा: Upcoming New Cars : येत्या काही महिन्यांत देशात एकापेक्षा एक भन्नाट कार होणार लाँच.
एकंदरीत पाहायला गेलं तर बहुतांश राज्यांवर हे भारतीय जनता पार्टीचं (BJP) सरकार आहे तसेच काही राज्यांवर स्थानिक राजकीय पक्षांचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळत आहे.