Ayushman Bharat : जर तुमची परिस्थिती जेमतेम असेल आणि दवाखान्याचा खर्च बजेटच्या बाहेर जात असेल तर काळजी करु नका. सरकारने आयुष्यमान भारत योजना सुरु केलेली आहे. या माध्यमातून जर तुम्ही तुमचे आरोग्य कार्ड काढले तर तुमचे 5 लाखांपर्यंतचे उपचार अगदी मोफत होतील.
वाढत्या महागाईच्या काळात दवाखान्याच्या बिलाच्या कटकटीतून मुक्तता मिळवायची असेल तर आरोग्य कार्ड आजच काढूण घ्या. ग्रामीण व शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या मागास लोकांना मोफत उपचारांची सुविधा मिळावी, या हेतूने केंद्र सरकारने 2018 मध्ये आयुष्यमान भारत योजना सुरू केली होती. पुढे या योजनेचे नाव प्रधानमंत्री जनआरोग्य योजना असे करण्यात आले आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना या दोन्ही योजनांची एकत्रित शिबिरे आपल्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये सुरू आहेत.
हे वाचा: 6 एप्रिल 2023 : आज तुमचा दिवस कसा राहिल? वाचा…
आरोग्य कार्ड कसे काढाल? : 2011 साली झालेल्या सामाजिक व आर्थिक जनगणनेनुसार जे लोक आर्थिकदृष्ट्या मागास घटकांमध्ये मोडले जातात, अशा लोकांची यादी केंद्र सरकारकडे आहे. यानुसार केंद्र सरकारने संबंधित लोकांना आरोग्य योजनेसंबंधीचे पत्र देखील पाठविले आहे. तसेच ज्यांना पत्र मिळाले नाही. पण, यादीत त्यांचे नाव आहे, असे लोकही आरोग्य कार्ड काढण्यास पात्र आहेत. त्यासाठी संबंधितांनी आपले आधार कार्ड घेऊन आरोग्यमित्रांना संपर्क करायचा आहे.
तसेच सध्या आपआपल्या जिल्ह्यात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचे एकत्रित शिबिर घेतले जात आहे, यात आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट व आरोग्य काढण्यासबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
हे वाचा: The Most Important Amicus Brief in the History of the World