Caste Certificate Verification : नुकतीच बारावी परिक्षा झाली आहे. आता ही परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी एससी, ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी करून घ्यावी लागते. तसेच एमएच-सीईटी, बीए, नर्सिंग, एलएलबी, अग्रो, फार्मसी, वैद्यकीय आदी अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही जात वैधता प्रमाणपत्राची गरज भासते. सदर प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा जात पडताळणी समितीने बाराही महिने ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहे.
जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्जदारांने प्रस्तावासोबत सक्षम प्राधिकरणाने दिलेला जातीचा दाखला आपल्या वंशावळीनुसार भरलेल्या अर्जाची प्रत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात सादर करायचा आहे. उमेदवारांना ऑनलाईन देखील अर्ज करता येतील. तुम्ही केलेल्या अर्जांची प्रिंट जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात शुल्क भरून जमा करा. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ज्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी करून घ्यावयाची असेल, त्यांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर करून प्रमाणपत्र उपलब्ध करता येऊ शकते.
हे वाचा: पेटीएम अँप डाउनलोड करून महिन्याला १०-२० हजार रुपये कमवा
कोणत्या विद्यार्थ्यांना आवश्यक? : एससी, ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी या कार्यालयात होते. एसटीसाठीचे कार्यालय वेगळे आहे. तिथेच त्यांची जात पडताळणी होते.
जात प्रमाणपत्र पडताळणी कशासाठी? : शैक्षणिक, सेवाविषयक, निवडणूक व इतर प्रयोजनात तसेच म्हाडातील घरासाठी आवश्यक आहे.
बाराही महिने सुविधा : पडताळणीसाठी अशी कोणतीही मुदत नाही. तुम्ही कधीही अगदी बाराही महिने अशी पडताळणी करु शकता. ती ऑनलाईन पद्धतीने देखील करु शकता. मात्र बारावीनंतरच्या अभ्यासक्रमासाठी ज्यांना आवश्यक आहे, त्यांनी मार्च अखेर प्रस्ताव सादर करणे फायद्याचे ठरेल.
आवश्यक कागदपत्रे : नमुना नंबर 16, दोन शपथपत्र (वंशावळचे व दुसरे जोडलेले कागदपत्रे खरे असल्याचे)