Bank of Maharashtra Bharti 2023 : सरकार नियंत्रित बँकेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न उराशी बाळगून असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये महत्वाचे पद भरण्यात येणार आहेत. (Bank of Maharashtra Recruitment 2023) ह्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. जाणून घेऊयात ह्या भरतीविषयी अधिक माहिती…
Bank of Maharashtra Bharti 2023 : बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये भरती सुरू
बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये भरती सुरू झालेली आहे. ह्या बाबतची अधिकृत जाहिरात बँकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार ह्या भरती प्रक्रियेअंतर्गत (Bank of Maharashtra Recruitment 2023) महत्वाच्या विविध पदांच्या तब्बल 100 जागा भरण्यात येणार आहे. भरती मध्ये भाग घेण्यासाठी इच्छुक उमेदवाराला महाराष्ट्र बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे. तसेच या बाबतची सविस्तर महती देखील त्याच वेबसाईटवर उपलब्ध आहे. ह्या भरती मध्ये भाग घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? शैक्षणिक पात्रता काय आहे? जाणून घ्या याबातची सविस्तर माहिती…
हे वाचा: Nashik Police Patil Bharti 2023 : नाशिक जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांसाठी भरती सुरु
Bank of Maharashtra Bharti 2023 : संपूर्ण अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | वयोमर्यादा
(30 सप्टेंबर 2023 पर्यंत) |
1 | क्रेडिट ऑफिसर स्केल II | 50 | 1) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी 2) MBA, PGDBA, PGDMA, CA, CFA, ICWA 3) 03 वर्षे अनुभव |
25 ते 32 वर्षे |
2 | क्रेडिट ऑफिसर स्केल III | 50 | 1) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
2) MBA, PGDBA, PGDMA, CA, CFA, ICWA हे वाचा: Indian Air Force Recruitment 2023 : भारतीय हवाई दलामध्ये भरती सुरु. 3) 05 वर्षे अनुभव |
25 ते 35 वर्षे |
शैक्षणिक पात्रतेमध्ये सूट :
एसटी (ST), एससी (SC), ओबीसी (OBC) आणि पीडब्ल्यूडी (PWD) प्रवर्गातील उमेदवारांना दोनही पदांकरिता गुणांमध्ये 5% सवलत मिळणार आहे.
वयामध्ये सूट :
हे वाचा: Nashik ZP Recruitment: नाशिक जिपमध्ये १०३८जागांसाठी भरती
या भरती प्रक्रियेमध्ये मागासवर्गीय प्रवर्गाला वयामध्ये 5 वर्षे सूट असणार आहे. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 03 वर्षांची सूट असणार आहे.
शुल्क :
जनरल, ओबीसी आणि इडब्लूएस प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार एकशे ऐंशी रुपये (₹1180/-) परीक्षा शुल्क असणार आहे. तसेच एसटी (ST), एससी (SC) आणि पीडब्ल्यूडी (PWD) प्रवर्गातील उमेदवारांना केवळ एकशे ऐंशी (₹118/-) रुपये परीक्षा शुल्क असणार आहे.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Bank of Maharashtra Bharti 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पाहा (Click Here)
जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात येथे पाहा (Click Here)
ऑनलाईन अर्ज – येथे करा (Click Here)
Bank of Maharashtra Recruitment 2023 : अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख –
वरील भरती प्रक्रियेत 06 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. तसेच परीक्षा कधी आहे? या बाबतची सविस्तर माहिती बॅंकेकडून नंतर कळविण्यात येणार आहे. या नोकरी संबंधिताच्या अधिक आणि सविस्तर माहितीसाठी कृपया वरती देलेली जाहिरात पाहा किंवा इथे क्लीक करा (Click Here).