Aurangabad & Usmanabad Names Changed : सरकारतर्फे राजपत्र जारी
नाव बदललं आता चित्र बदलावं : नागरिकांची अपेक्षा.
जुन्या जमान्यातील किंवा आधीच्या प्रशासकांनी दिलेली नाव बदलण्याची सुरुवात महाराष्ट्रात झाली आहे.
काही काळापूर्वी औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले तर उस्मानाबादचे नाव धाराशिव केले गेले. पण त्यावेळी शहराचे नाव बदलले होते. आता शहरानंतर जिल्ह्याचंही नावंही बदलण्यात आले आहे. जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव धाराशिव झालं आहे. पूर्वी राजपत्र जारी न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला विचारणा केलेली.
ह्या संदर्भात सरकारतर्फे राजपत्र पण जारी करण्यात आलेले आहे. औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे शहराचं नाव धाराशिव करण्यात आलं होतं. परंतु औरंगाबाद विभाग, जिल्हा, उप-विभाग, तालुका आणि गाव तसंच उस्मानाबाद जिल्हा, उप-विभाग, तालुका आणि गावाचं नाव बदललेलं नव्हतं. ते आता राजपत्र जारी करुन बदलण्यात आलं आहे.
पूर्वी |
आजपासून |
औरंगाबाद विभाग | छत्रपती संभाजीनगर विभाग |
औरंगाबाद जिल्हा | छत्रपती संभाजीनगर जिल्हा |
औरंगाबाद उप-विभाग | छत्रपती संभाजीनगर उप-विभाग |
औरंगाबाद तालुका | छत्रपती संभाजीनगर तालुका |
औरंगाबाद गाव | छत्रपती संभाजीनगर गाव |
उस्मानाबाद जिल्हा | धाराशिव जिल्हा |
उस्मानाबाद उप-विभाग | धाराशिव उप-विभाग |
उस्मानाबाद तालुका | धाराशिव तालुका |
उस्मानाबाद गाव | धाराशिव गाव |
सरकारने राजपत्र जारी केल्याने आता सगळीकडे ही नावं बदलली जातील.
हे वाचा: UPSC Results 2022 : यूपीएससी 2022 परीक्षेचा निकाल जाहीर.
हे वाचा: Morocco Earthquake - मोरोक्कोमध्ये भूकंप