Thursday , 2 January 2025
Home Health NIPAH VIRUS : निपाह व्हायरस पाय पसरतोय?
Health

NIPAH VIRUS : निपाह व्हायरस पाय पसरतोय?

Nipah Virus
LetsTalk_Health

NIPAH VIRUS : निपाह व्हायरस पाय पसरतोय?

भारतात केरळ मध्ये निपाह व्हायरसचे २ रुग्ण आढळल्यावर आता महाराष्ट्रात पण सातारा, महाबळेश्वर परिसरात निपाह व्हायरस वटवाघळांमध्ये आढळला असल्याचे समजते. प्राण्यांमधून पसरणाऱ्या व्हायरसला झुटॉनिक व्हायरस म्हणतात. डुक्कर, कुत्री, बकरी, मांजर ह्यांचं माध्यमातून असे व्हायरस चटकन पसरतात. निपाहसुद्धा ह्याच प्रकारातला व्हायरस आहे.

आरोग्यतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार रुग्ण व्हायरसच्या संपर्कात आल्यावर निपाह व्हायरसची लक्षणे साधारण ५-१५ दिवसात जाणवायला लागतात.

हे वाचा: World Ozone Day 16 Sept : जागतिक ओझोन दिवस

रुग्णाला जाणवणारी लक्षणे –

High-grade fever (भरपूर जास्त ताप)
Muscle ache and body pain (सततची अंगदुखी)
Headache (डोकेदुखी)
Nausea and vomiting (मळमळ आणि उलट्या)
A persistent cough (सततचा कफ)
Difficulty breathing (श्वास घेण्यास त्रास)
Seizures (चक्कर किंवा चमक येणे)

अश्या तक्रारी जाणवत असतील तर सामान्य ताप किंवा फ्ल्यू सारखी लक्षणे म्हणून दुर्लक्ष करू नये. त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

भारतातल्या केरळ तामिळनाडू भागात रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. महाराष्ट्रातसुद्धा आता काही शंकास्पद रुग्ण आढळत आहेत. निपाहवर कुठलीही लस सध्यातरी उपलब्ध नसल्याने स्वाईन फ्ल्यू पेक्षा हा आजार बरा होण्यास खूप वेळ लागतो आणि निपाहामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे.

हे वाचा: How to Remove Tan From Skin? : चेहरा, हात टॅन झालेत? कोणते उपाय केले पाहिजे? जाणून घ्या.

आपली काळजी घेणे आपल्याच हातात आहे.

– बाहेरून घरात आल्यावर हात पाय स्वच्छ साबणाने धुवावेत.
– डोळे, नाक, तोंडाला हात लावण्याचे टाळावे.
– हात स्वच्छ साबणाने नियमित धुवावेत.
– प्रतिकारशक्ती वाढवणारे व्यायाम करावेत तसेच ताजे आणि घरचे अन्नपदार्थ खावेत.
– आजारी पडल्यास विश्रांती घेणे आणि डॉक्टरांशी सल्लामसलत करूनच औषधं घ्यावीत.

 

हे वाचा: World Suicide Prevention Day : जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन

Related Articles

What is cholesterol? How to control cholesterol?
HealthLifestyle

What is cholesterol? : कोलेस्ट्रॉल म्हणजे नेमकं काय? कोलेस्ट्रॉल कसं नियंत्रित ठेवायचं?

What is cholesterol? : उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयरोग, स्ट्रोक आणि इतर हृदय व...

Global Health Issues
GKHealthLifestyle

Global Health Issues : जागतिक आरोग्य समस्या, ज्यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते

Global Health Issues : अलिकडच्या वर्षांत जगाला अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा...

What precautions should be taken while buying food? : खाद्यपदार्थ विकत घेताना काय काळजी घ्यावी?
FoodHealth

What precautions should be taken while buying food? : खाद्यपदार्थ विकत घेताना काय काळजी घ्यावी?

What precautions should be taken while buying food? : नवरात्र, दसरा, दिवाळीच्या...

How to improve concentration in kids?
HealthLifestyle

How to improve concentration in kids? : मुलांमध्ये एकाग्रता कशी वाढवायची?

How to improve concentration in kids? : आजच्या वेगवान जगात, मुलांमधील एकाग्रता...