6 Budget Friendly Furniture Ideas : फर्निचर ही आजच्या युगात एकदम गरजेची गोष्ट झालेली आहे. पण भरगच्च फर्निचरचा जमाना गेला. आता मिनिमल स्टाईल फर्निचर आणि बजेट फ्रेंडली फर्निचरकडे लोकांचा ओढा जास्त आढळतो.
जी गोष्ट खोली किंवा इतर जागा सुसज्ज करण्यासाठी वापरली जाते त्यांना आपण फर्निचर म्हणतो. फर्निचर लाकूड, धातू, प्लास्टिक आणि काच यासह विविध साहित्यापासून बनवले जाते. गरज आणि उद्देशानुसार फर्निचर बनवणे महाग किंवा स्वस्त असू शकते.
6 Budget Friendly Furniture Ideas : बजेट फ्रेंडली फर्निचर आयडिया
बजेट हे नेहमी सापेक्ष समजले जाते. गरज आणि आवश्यकता ह्याचा मेळ घालून फर्निचर केले तर ते नेहमीच खिशाला परवडणारे असते.
हेही वाचा : Banknotes with star symbol : ‘स्टार’ चिन्ह असलेल्या नोटा कायदेशीर आहेत का?
6 Budget Friendly Furniture Ideas : वापरलेले फर्निचर विकत घ्या – Used Furniture –
अनेकदा वापरलेल्या फर्निचरवर अनेक उत्तम सौदे असतात. तुम्हाला असे 2nd hand किंवा used furniture काही स्पेसिफिक दुकानांमध्ये आणि ऑनलाइन मार्केटप्लेसमध्ये वापरलेले फर्निचर मिळू शकते.
हे वाचा: Gujarati Breakfast : मज्जानु नाश्ता ! गुजरातमधील नाश्त्याचे 6 लोकप्रिय पर्याय
6 Budget Friendly Furniture Ideas : सवलतीच्या फर्निचर स्टोअर्समध्ये खरेदी करा – Discount Store –
अनेक फर्निचर स्टोअर्स असे असतात की जे परवडणारे फर्निचर देतात. या स्टोअरमध्ये तुम्हाला विविध प्रकारातले आणि गुणवत्ता असणारे फ्रीनिचर मिळू शकते.
तुमचे स्वतःचे फर्निचर बनवा – Own Designed Furniture
स्वतः डिझाईन करून सुताराला सांगून हवे तसे फर्निचर आपण बनवून घेऊ शकतो.
6 Budget Friendly Furniture Ideas : मिनिमलिस्ट फर्निचरची निवड करा – Minimalist –
मिनिमलिस्ट फर्निचर हा आजकालचा ट्रेंड आहे. हे पारंपारिक फर्निचरपेक्षा अधिक परवडणारे असते. हे अधिक अष्टपैलू देखील आहे आणि म्ह्क्य म्हणजे वापर अगदी सुटसुटीत असतो.
हे वाचा: 12 Smart Tips for Refrigerator : स्मार्ट टिप्स तुमच्या फ्रिजसाठी.
टिकाऊ साहित्यापासून बनवलेले फर्निचर निवडा – Long Lasting –
एकदाच जर आपण फर्निचर करणार असू तर मटेरियल असे वापरावे जे फर्निचर अनेक वर्षे टिकेल याची खात्री देऊ शकेल.
तुमच्या जागेचा आकार विचारात घ्या – Space Saving –
फर्निचर निवडताना तुमच्या जागेचा आकार विचारात घ्या. जागा अडवणारे फर्निचर कधीही घेऊ नका.
Budget Friendly Furniture Tips : बजेटमध्ये फर्निचर खरेदी करण्यासाठी काही टिपा :
- तुम्ही खरेदी सुरू करण्यापूर्वी, विविध फर्निचर स्टोअर्स आणि ब्रँडचे संशोधन करण्यासाठी थोडा वेळ द्या. असे केल्याने किमतींची तुलना करण्यात आणि सर्वोत्तम सौदे शोधण्यात मदत होईल.
- अनेक फर्निचर स्टोअर्स किमतींवर बार्गेनिंग करू देतात. म्हणून, कमी किंमत विचारण्यास घाबरू नका.
- ऑफ-सीझनमध्ये फर्निचरच्या किमती अनेकदा कमी असतात. म्हणून, हिवाळ्यात किंवा उन्हाळ्याच्या महिन्यांत फर्निचर खरेदी करण्याचा प्रयत्न करा.
- घाईच निर्णय फर्निचर करतेवेळी घेऊ नका. नीट काळ्जीपूर्ण गरज आणि आवश्यकता ह्याचा विचार करून निर्णय घ्या.