Mahamesh Yojana : महाराष्ट्रात मेंढ्या पालनाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात होत. कालांतराने मध्यंध्य पालनात मोठी घट झाली आहे. राज्यातील मेंढीपालनातील घट रोखण्यासासाठी राज्य शासनाने एक महत्वाचं पाऊल उचललं होत. राज्यातील मेंढ्यांची संख्या वाढवण्यासाठी तसेच राज्यातील मेंढ्या पालनाच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘महामेश योजना’ सुरु केली होती.
या योजनेअंतर्गत सरकारकडून मेंढीपालकांना मेंढ्या, मेंढ्यांसाठी खाद्य आणि इतर बाबींसाठी म्हणून 75% अनुदान दिले जाते तसेच चारा आणि फीड मिल्सच्या गाठी तयार करण्यासाठी यंत्रणा उभारण्यासाठी 50% अनुदान दिले जाते. नेमकी काय आहे ही योजना? जाणून घेऊयात.
हे वाचा: CIDCO Scheme Home Loan : सिडकोच्या स्कीममधील घरांसाठी मिळणार आता होम लोन.
Mahamesh Yojana : नेमकी काय आहे ही योजना?
राज्यातील मेंढीपालनाचा व्यवसाय वाढवण्यासाठी सरकारने ही योजना चालू केली होती. आता या योजनेचा लाभ कोणाला घेता येणार? या योजनेसाठी पात्रता निकष काय आहेत? कागतपत्रे कोण-कोणती लागतात? अर्ज कुठे करायचा? याबाबतची सर्व माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे.
Mahamesh Yojana : अनुदान कसं मिळणार?
या योजनेअंतर्गत मेंढीपालकांना मेंढ्या, मेंढ्यांसाठी खाद्य आणि इतर बाबींसाठी म्हणून 75% अनुदान दिले जाते तसेच चारा आणि फीड मिल्सच्या गाठी तयार करण्यासाठी यंत्रणा उभारण्यासाठी 50% अनुदान दिले जाते. तसेच ज्यांना हा व्यवसाय सुरु करायचा आहे अशा लाभार्थ्यांना सरकारकाढून 20 मेंढ्या व एक नार मेंढी दिली जाते. या मेंढ्यांचे वाटप 75% अनुदानावर केले जाते. एवढंच नाही तर या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड करताना महिलांसाठी 30% आणि अपंगांसाठी 3% आरक्षण देण्यात आले आहे.
या योजनेसाठी पात्रता निकष काय?
ही योजना फक्त भटक्या जमाती (भज-क) श्रेणीतील लाभार्थ्यांना लागू आहे. अन्य प्रवर्गातील व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही. तसेच लाभार्थी हा महाराष्ट्रातील नागरिक असला पाहिजे. यासोबत लाभार्थीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 60 वर्षांपेक्षा जास्त नसले पाहिजे. सविस्तर पात्रता निकष जाणून घेण्यासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा.
हे वाचा: Deen Dayal Upadhyaya Grameen Kaushalya Yojana : दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना
महामेश योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :
या योजनेसाठी आधार कार्ड, शिधापत्रिका, रहिवासी पुरावा, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, जमिनीची कागदपत्रे, जमिनीतील सह-भागीदारांचे ना हरकत प्रमाणपत्र, पशुपालन प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, वयाची नोंदणी आणि उत्पन्नाचा दाखल या सर्व कागतपत्रांची आवश्यकता असते.
Mahamesh Yojana : अर्ज कुठे करायचा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे. अर्ज महामंडळाच्या www.mahamesh.in या अधिकृत वेबसाईटवरून दाखल करू शकता किंवा MAHAMESH या App वरून देखील अर्ज करू शकता. अर्ज दाखल केल्यानंतर तुमच्या अर्जाची छाननी केली जाईल. तसेच तुमची शासकीय पद्धतीने तुमची निवड केली जाईल. निवड झाल्यास तस तुम्हाला कळविण्यात येईल.
अधिकृत वेबसाईट : येथे पहा
हे वाचा: MGNREGA Yojana : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा)
महामेश योजनेबाबतच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.