CIDCO Scheme Home Loan : सिडको नेमकं काय करते हे समजून घेतलं तर पुढली प्रक्रिया समजणे सोपे होईल.
सिडको (City and Industrial Development Corporation) म्हणजे शहर आणि औद्योगिक विकास महामंडळची फ्लॅट सिस्टीम ही सरकारने लागू केलेली गृहनिर्माण योजना आहे. सिडको ही राज्यातील शहरे आणि औद्योगिक क्षेत्रांच्या विकासासाठी प्रयत्नशील असलेली शासकीय संस्था आहे. सिडकोचे उद्दिष्ट म्हणजे भारतातील कुटुंबांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचे आहे. या प्रणाली अंतर्गत सिडको निवासी इमारती बांधते आणि पात्र अर्जदारांना लॉटरी प्रणालीद्वारे सदनिका विकते. इथले फ्लॅट्स हे पूर्वनिर्धारित किमतींवर उपलब्ध असतात. ह्या पूर्वनिर्धारित किमती सामान्यतः बाजारभावापेक्षा कमी असतात. कमी आणि मध्यम-उत्पन्न गटांसाठी अश्या फ्लॅट स्कीम्स अधिक सोयीच्या असतात.
सिडको फ्लॅट सिस्टिमचे महत्त्व वाढत्या लोकसंख्येच्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जास्त आहे.
CIDCO Scheme Home Loan : सिडकोची महत्वाची उद्दिष्ट्ये –
1. परवडणारी घरे : सिडको अशा व्यक्तींना परवडणाऱ्या घरांचे पर्याय उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित करते ज्यांना सध्याचे चढे बाजारभाव परवडत नाहीत.
हेही वाचा : What is Home Loan : ये होम लोन आखीर क्या है..? जाणून घेऊयात अधिक माहिती.
हे वाचा: Startup India Seed Fund Scheme : स्टार्टअप इंडिया सीड फंड योजना - सरकारचा 1 झकास उपक्रम.
2. नियोजित विकास : शाळा, रुग्णालये, उद्याने आणि सार्वजनिक वाहतूक यासारख्या आवश्यक पायाभूत सुविधांसह फ्लॅट्स सुनियोजित निवासी भागात बांधले गेले आहेत. यामुळे शाश्वत शहरी विकासाला चालना मिळते.
3. लॉटरी प्रणाली : लॉटरी प्रणालीद्वारे फ्लॅटचे वाटप पारदर्शकता आणते आणि सर्व पात्र अर्जदारांसाठी समान संधी उपलब्ध करून देते.
4. आर्थिक वाढ : परवडणारी घरे उपलब्ध करून दिल्याने सिडको रोजगाराच्या संधी निर्माण करते आणि बांधकाम आणि पायाभूत सुविधांच्या विकासाशी संबंधित विविध क्षेत्रांना चालना देते.
5. सरकारी पुढाकार : सिडको सामाजिक कल्याणासाठी आणि नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्नशील असते.
CIDCO Scheme Home Loan : ह्या बँकांनी कर्ज देण्यासाठी संमती दर्शवली –
सिडको मध्ये जेंव्हा आपण घर घेता तेंव्हा आपणाला कर्ज देण्यासाठी अनेक बँका पुढे येतील.
त्यातील काही महत्वाच्या बँका खालीलप्रमाणे –
- स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
- पंजाब नॅशनल बँक (PNB)
- ऍक्सिस बँक (Axis Bank)
- कॅनरा बँक (Canara Bank)
- ठाणे जनता सहकारी बँक (TJSB Bank)
ह्या बॅन्क आजच्या काळात सिडको अंतगर्त असणाऱ्या फ्लॅट्ससाठी कर्ज पुरवठा (CIDCO Scheme Home Loan) करतात. अर्थात आपण जर अश्या कुठल्या सिडकोच्या स्कीममध्ये घर घेत असाल आणि कर्जासाठी वरील बँकांच्या शाखेत चौकशीला गेलात तर तिथल्या नियमानुसार आणि बँकेच्या कार्यक्षेत्रानुसार आपणाला कर्ज मिळू शकेल.