कोणत्याही उपग्रहाला अवकाशात सोडताना पाठीमागे ऐकू येणार एक आवाज असतो.
म्हणजे काऊंटडाऊन सुरु होतं, बाकी सूचना दिल्या जातात, उपग्रह प्रक्षेपित होतो, आणि नन्तर त्याच्या कक्षेत स्थिरावेपर्यंत तो आवाज ऐकू येत असतो. एक व्यक्ती ह्या सगळ्याकडे लक्ष ठेवून असते आणि सातत्याने उद्घोषणा करत असते.
भारतातल्या इस्रोमध्ये असाच एक आवाज गेली अनेक वर्षे हे काम करतोय. इस्रोच्या शास्त्रज्ञ एन. वलारमथी ह्यांचं आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. चांद्रयान-३च्या प्रक्षेपणाला काऊंटडाऊन देणारा आवाज पुन्हा कधीही ऐकू येणार नाही.
हे वाचा: Udhayanidhi Stalin : उदयनीधी स्टालिन काय म्हणाले?
गेल्या शनिवारी, 3 सप्टेंबररोजी संध्याकाळी चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं, त्या 64 वर्षांच्या होत्या. चांद्रयान-3 च्या लाँचिंगसह त्यांनी 30 जुलै PSLV-C56 रॉकेट लाँचिंगला शेवटचा काऊंटडाऊन दिला.
तामिळनाडूमधल्या एका छोट्याश्या गावात जन्मलेल्या वलारामथी यांनी आपल्या कर्तबगारीवर पहिल्या स्वदेशी रडार इमेजिंग उपग्रह प्रकल्पाच्या संचालकपदापर्यंत मजल मारली होती. गेल्या सहा वर्षांपासून त्या इस्रोच्या सर्व मिशनसाठी काऊंटडाऊन देत होत्या. 2015 मध्ये त्यांना अब्दुल कलाम पुरस्कार मिळालेला.
31 जुलै 1959 रोजी अरियालूर येथे जन्मलेल्या एन. वलारमथी ह्यांचं सुरुवातीचं शिक्षण निर्मला गर्ल्स हायर सेकंडरी स्कूलमधून झालं. त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, कोईम्बतूरमधून त्यांनी इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केली. नन्तर अण्णा विद्यापीठातून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये मास्टर्स पदवी प्राप्त केली आणि नंतर 1984 मध्ये त्या इस्रोमध्ये (ISRO) रुजू झाल्या.
हे वाचा: Maratha Reservation : मनोज जरांगेची तब्येत बिघडली
इस्रोमध्ये त्यांनी रिमोट सेन्सिंग उपग्रहांच्या प्रक्षेपणाशी संबंधित प्रकल्पांची जबाबदारी सांभाळली. हळूहळू त्या डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर ते प्रोजेक्ट मॅनेजर पदापर्यंत पोहोचल्या. देशातील पहिला स्वदेशी रडार इमेजिंग सॅटेलाईट प्रकल्प RISAT-1 चं संचालक पद देखील एन. वलारमथी ह्यांनी भूषवलं होतं.
हे वाचा: Nashik ZP Recruitment: नाशिक जिपमध्ये १०३८जागांसाठी भरती