WRD Maharashtra Recruitment 2023 : सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. सरकारच्या जलसंपदा विभागामध्ये मेगा भरती होणार आहे. ह्या भरती अंतर्गत 14 विविध पदांच्या तब्बल 4 हजार 497 जागा भरण्यात येणार आहे. त्यामुळे तरुणांसाठी ही सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. जाणून घेऊयात ह्या भरती विषयी अधिक माहिती.
WRD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र जलसंपदा विभागात भरती सुरु
महाराष्ट्र जलसंपदा विभागात 4 हजार 497 जागांसाठी मेगा भरती (महाराष्ट्र जलसंपदा विभाग भरती 2023) सुरु झालेली आहे. या बाबतची अधिकृत जाहिरात महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यास देखील आज पासून सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवार जलसंपदा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन किंवा खाली दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज करू शकता. चला तर मग ह्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? या भरती मध्ये कोण कोणत्या जागा भरण्यात येणार आहे? ऑनलाईन अर्ज कुठे आणि कसा करायचा? जाणून घेऊयात या बाबतची सविस्तर माहिती
हे वाचा: SSC JE Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'या' पदांसाठी मेगा भरती सुरु.
महाराष्ट्र जलसंपदा विभाग भरती 2023 : पदांचा संपूर्ण तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता आणि अनुभव |
1 | वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) | 04 | 60% गुणांसह भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र/कृषी पदव्युत्तर पदवी |
2 | निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) | 19 | 1) 10वी उत्तीर्ण
2) लघुलेखन 100 श.प्र.मि. 3) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. |
3 | कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) | 14 | भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र/कृषी पदव्युत्तर पदवी |
4 | वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) | 05 | भूगर्भ शास्त्र किंवा उपयोजित भूगर्भ शास्त्र पदवी किंवा भूगर्भ शास्त्र डिप्लोमा |
5 | आरेखक (गट-क) | 25 | स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा+03 वर्षे अनुभव |
6 | सहाय्यक आरेखक (गट-क) | 60 | स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा |
7 | स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) | 1528 | स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा |
8 | प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क) | 35 | भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र पदवी |
9 | अनुरेखक (गट-क) | 284 | 1) 10वी उत्तीर्ण
2) ITI (आरेखक स्थापत्य) किंवा कलाशिक्षक डिप्लोमा |
10 | दफ्दर कारकुन (गट-क) | 430 | 1) कोणत्याही शाखेतील पदवी
2) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. |
11 | मोजणीदार (गट-क) | 758 | 1) कोणत्याही शाखेतील पदवी
2) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. |
12 | कालवा निरीक्षक (गट-क) | 1189 | 1) कोणत्याही शाखेतील पदवी
2) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. |
13 | सहाय्यक भांडारपाल (गट-क) | 138 | 1) 10वी उत्तीर्ण
2) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. |
14 | कनिष्ठ सर्व्हक्षण सहाय्यक (गट-क) | 08 | 1) 12वी (भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/गणित/इंग्रजी) उत्तीर्ण
2) ITI भूमापक (सर्वेक्षक) 3) कृषी डिप्लोमा धारकांना प्राधान्य |
Total | 4497 |
महाराष्ट्र जलसंपदा विभाग भरती 2023
वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत 18 ते 38 वर्षे या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीय प्रवर्ग, अनाथ, आदुघ तसेच दिव्यांग उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षे सूट असणार आहे.
शुल्क :
या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जनरल आणि ओबीसी (OBC) या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये (₹1000/-) शुल्क असणार आहे तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना नऊशे रुपये (₹900/-) शुल्क असणार आहे.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
WRD Maharashtra Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पाहा (Click Here)
जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात येथे पाहा
ऑनलाईन अर्ज – येथे करा (Click Here)
महाराष्ट्र जलसंपदा विभाग भरती 2023 : अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख –
वरील भरती प्रक्रियेत 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. या नोकरी संबंधिताच्या अधिक आणि सविस्तर माहितीसाठी कृपया वरती देलेली जाहिरात पाहा किंवा इथे क्लीक करा (Click Here).