Maharashtra Metro Recruitment 2023 : महाराष्ट्र मेट्रो रेल्वेमध्ये भरती सुरु झालेली आहे. ह्या भरती प्रक्रियेअंतर्गत विविध पदांसाठी एकूण 134 जागा भरण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रता केवळ दहावी पास आणि संबंधित ITI चा कोर्स झालेला असणे आवश्यक आहे. संबंधित भरतीची अधिकृत जाहिरात महा मेट्रोकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Maharashtra Metro Recruitment 2023 : महाराष्ट्र मेट्रो रेल्वेत भरती सुरु
संबंधित भरती नागपूर, पुणे आणि नवी मुंबई या ठिकाणांसाठी होणार आहे. ह्या भरतीमध्ये अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घेऊयात या भरती बाबतची संपूर्ण माहिती.
हे वाचा: MSC Bank Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती सुरु; असा करा अर्ज
Maharashtra Metro Recruitment 2023 : संपूर्ण अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे
अ. क्र. | ट्रेड | नागपूर | पुणे | नवी मुंबई |
1 | इलेक्ट्रिशियन | 24 | 18 | 03 |
2 | इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक | 17 | 13 | 02 |
3 | फिटर | 25 | 17 | 03 |
4 | लिफ्ट & एस्केलेटर मेकॅनिक | 03 | 03 | 01 |
5 | मेकॅनिक (फ्रीज &AC) | 02 | 02 | 01 |
Total | 71 | 53 | 10 | |
Grand Total | 134 |
शैक्षणिक पात्रता :
1) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
2) संबंधित ITI उत्तीर्ण
हे वाचा: NHPC Recruitment 2023 : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये भरती सुरु, 'असा' करा अर्ज
वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 27 ऑक्टोबर 2023 पर्यंत 17 ते 24 वर्षे वर्षे या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षे सूट असणार आहे. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 3 वर्षांची सूट असणार आहे.
हे वाचा: Territorial Army Recruitment 2023 : भारतीय प्रादेशिक सेना भरती 2023; असा करा अर्ज
नोकरी ठिकाण : नागपूर, पुणे आणि नवी मुंबई
शुल्क :
या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जनरल आणि ओबीसी (OBC) या प्रवर्गातील उमेदवारांना एकशे पन्नास रुपये (₹150/-) शुल्क असणार आहे तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना आणि महिलांना पन्नास रुपये (₹50/-) शुल्क असणार आहे.
Maharashtra Metro Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पाहा (Click Here)
जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात येथे पाहा
ऑनलाईन अर्ज – येथे करा (Click Here)
Maharashtra Metro Recruitment 2023 : अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख –
वरील भरती प्रक्रियेत 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. या नोकरी संबंधिताच्या अधिक आणि सविस्तर माहितीसाठी कृपया वरती देलेली जाहिरात पाहा किंवा इथे क्लीक करा (Click Here).