WPL RCB Squad : इंडियन प्रीमिअर लीग (IPL) प्रमाणेच आता वूमन्स प्रीमियर लीगचा (Women’s Premier League) थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे. वूमन्स आयपीएलच्या (WPL) पहिल्या सीझनमध्ये 5 फ्रँचायझींचे संघ असणार आहे. यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB), दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals), गुजरात जायंट्स (Gujarat Giants), मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि यूपी वॉरियर्सवूमन्स ( UP Warriors Women) या संघांचा समावेश आहे.
याच दरम्यान काल मुंबई येथे वूमन्स प्रीमियर लीगच्या (Women’s Premier League) पहिल्या सिझनसाठी लिलाव पार पडला. कालच्या लिलावात स्टार खेळाडूंना विकत घेण्यासाठी सर्वच 5 संघांत चुरस पाहायला मिळाली. पण काही स्टार खेळाडूंना विकत घेण्यासाठी कोणत्याच संघानी उत्सुकता दाखवली नाही. यातच भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधानावर अपेक्षेप्रमाणे सर्वाधिक बोली लागली. स्मृती मंधानाला विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या फ्रँचायझीने 3.40 करोड रुपयांची बोली लावत खरेदी केलं. यासोबतच भारतासह जगभरातील अनेक खेळाडूंवर करोडोंची बोली काल लागली. तर जाणून घेऊयात बंगलोरच्या फ्रँचायझीने कोणते खेळाडू विकत घेतले.
हे वाचा: 20 फेब्रुवारी 2023 : आज तुमचा दिवस कसा राहील? वाचा…
असा आहे रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा संघ
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू –
स्मृती मानधना (3.4 कोटी), सोफी डिव्हाईन (50 लाख), एलिस पेरी (.7 कोटी), रेणुका सिंग (1.5 कोटी), रिचा घोष (1.9 कोटी), एरिन बर्न्स (30 लाख), दिशा कासट (10 लाख), इंद्राणी रॉय (10 लाख), श्रेयंका पाटील (10 लाख), कनिका आहुजा (35 लाख), आशा शोबाना (10 लाख), हीदर नाइट (40 लाख), डेन व्हॅन निकेर्क (30 लाख), प्रीती बोस (0 लाख), पूनम खेमनार (10 लाख), कोमल झांझाड (25 लाख), मेगन शुट (40 लाख), सहाना पवार (10 लाख)
प्रीमियर लीगच्या लिलावात प्रत्येक फ्रँचायझींना खेळाडू खरेदी करण्यासाठी 12 कोटी रुपयांचं बजेट देण्यात आलं होत. या बजेट मधून प्रत्येक फ्रँचायझीला कमीत कमी 15 खेळाडू आणि जास्तीत जास्त 18 खेळाडू खरेदी करावे लागणार होते.
हे वाचा: 11 मार्च 2023 : आज तुमचा दिवस कसा राहिल? वाचा…
वूमन्स प्रीमियर लीगचा थरार कधी रंगणार?
बीसीसीआयने अधिकृतपणे दिलेल्या माहितीनुसार वूमन्स प्रीमियर लीगचा थरार येत्या 4 मार्च ते 26 मार्च 2023 या कालावधी दरम्यान रंगणार आहे. तसेच या लीगचे सर्व सामने मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत, म्हणजेच मुंबईच्या संघाला होम ऍडव्हान्टेज मिळणार आहे. वूमन्स प्रीमियर लीगच्या पहिल्या सिझनमध्ये एकूण 22 सामने खेळवले जाणार आहेत.