WPL Mumbai Indians Squad : इंडियन प्रीमिअर लीग (IPL) प्रमाणेच आता वूमन्स प्रीमियर लीगचा (Women’s Premier League) थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे. वूमन्स आयपीएलच्या (WPL) पहिल्या सीझनमध्ये 5 फ्रँचायझींचे संघ असणार आहे. यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB), दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals), गुजरात जायंट्स (Gujarat Giants), मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि यूपी वॉरियर्सवूमन्स ( UP Warriors Women) या संघांचा समावेश आहे.
याच दरम्यान काल मुंबई येथे वूमन्स प्रीमियर लीगच्या (Women’s Premier League) पहिल्या सिझनसाठी लिलाव पार पडला. कालच्या लिलावात स्टार खेळाडूंना विकत घेण्यासाठी सर्वच 5 संघांत चुरस पाहायला मिळाली. पण काही स्टार खेळाडूंना विकत घेण्यासाठी कोणत्याच संघानी उत्सुकता दाखवली नाही. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरला मुंबईच्या संघाने (Mumbai Indians) करोडोंची बोली लावत आपल्या संघात सामील करून घेतलं. तसेच मुंबईने नताली सायव्हर या खेळाडूला सर्वाधिक (3.2 कोटी) रुपयांची बोली लावली. यासोबतच भारतासह जगभरातील अनेक खेळाडूंवर करोडोंची बोली काल लागली. तर जाणून घेऊयात मुंबईच्या फ्रँचायझीने कोणते खेळाडू विकत घेतले.
हे वाचा: Preparation for firefighter recruitment :अग्निवीर भरतीची तयारी करताय? मग अगोदर ही बातमी वाचा…
‘असा’ आहे मुंबईचा संघ –
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) –
हरमनप्रीत कौर (1.8 कोटी), नताली सायव्हर (3.2 कोटी) अमेलिया केर (1 कोटी), पूजा वस्त्राकर (1.9 कोटी), यास्तिका भाटिया (1.5 कोटी), हीदर ग्रॅहम (30 लाख), इसाबेल वोंग (30 लाख), अमनजोत कौर (50 लाख), धारा गुजर (10 लाख), सायका इशाक (10 लाख), हेली मॅथ्यूज (40 लाख), क्लो ट्रायॉन (30 लाख), हुमैरा खाझी (10 लाख), प्रियांका बाला (20 लाख), सोनम यादव (10 लाख), जिंतीमणी कलिता (10 लाख), नीलम बिश्त (10 लाख)
प्रीमियर लीगच्या लिलावात प्रत्येक फ्रँचायझींना खेळाडू खरेदी करण्यासाठी 12 कोटी रुपयांचं बजेट देण्यात आलं होत. या बजेट मधून प्रत्येक फ्रँचायझीला कमीत कमी 15 खेळाडू आणि जास्तीत जास्त 18 खेळाडू खरेदी करावे लागणार होते.
हे वाचा: How to make your life routine more fun and eco-friendly
वूमन्स प्रीमियर लीगचा थरार कधी रंगणार?
बीसीसीआयने (BCCI) अधिकृतपणे दिलेल्या माहितीनुसार वूमन्स प्रीमियर लीगचा (Women’s Premier League) थरार येत्या 4 मार्च ते 26 मार्च 2023 या कालावधी दरम्यान रंगणार आहे. तसेच या लीगचे सर्व सामने मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत, म्हणजेच मुंबईच्या संघाला होम ऍडव्हान्टेज मिळणार आहे. वूमन्स प्रीमियर लीगच्या पहिल्या सिझनमध्ये एकूण 22 सामने खेळवले जाणार आहेत.