Mutual Funds Investment Planning :
पैसा असला की, तो वाढवायचा कसा? याकडे लोकांचा विशेष कल असतो. मग जास्त व्याज कुठं मिळतंय का, सरकारी योजना आहे का? याचा शोध घेतला जातो. मात्र ज्यांना नियमित गुंतवणूक न करता पैसे वाढवायचे असतील तर अशांसाठी म्युच्युअल फंड सर्वोत्तम पर्याय ठरतो.
एसपीद्वारे 500 किंवा 1000 रुपये देऊनही तुम्ही हे सुरू करु शकता. विशेष बाब म्हणजे यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. ऑनलाईन अॅपद्वारे गुंतवणूक करणे सोपे आहे. तुम्हीही याची सुरुवात करणार असाल तर खालील काही गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा, तुमचाच फायदा होईल…
हे वाचा: 17 फेब्रुवारी 2023 : आज तुमचा दिवस कसा राहिल? वाचा…
फंडाची निवड : कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी योग्य म्युच्युअल फंड निवडणे, हे खूप महत्वाचे आणि आव्हानात्मक काम आहे. काही लोक झटपट गुंतवणूक करतात, परंतु नंतर योग्य परतावा न मिळाल्याने मग अशांची निराशा होते. त्यामुळे पैसे त्याच म्युच्युअल फंडात गुंतवा जो वेळेनुसार तुमची गरज पूर्ण करू शकेल. यासाठी तुम्ही चार्टचे विश्लेषण करून त्यानुसार लिस्ट बनवा. यानंतर, जिथे तुम्हाला अधिक परतावा मिळेल तिथे गुंतवणूक करा. याशिवाय तुम्ही यासाठी आर्थिक सल्लागाराचीही मदत घेऊ शकता.
खर्चाचं गुणोत्तर पाहा : गुंतवणूक करण्यापूर्वी वेळेनुसार खर्चाचे प्रमाण तपासा. साधारणपणे लोकांना फंडावर 14 ते 15 टक्के परतावा मिळण्याची अपेक्षा असते. परंतु खर्चाचे प्रमाण या दरम्यान येत असल्याने हा दरही खाली येतो. खर्चाचे प्रमाण म्हणजे काय? तर निधी व्यवस्थापनावर होणाऱ्या खर्चाला खर्चाचे प्रमाण असे म्हणतात.
चढ-उताराचा परिणाम : म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्यापूर्वी शेअर बाजारावर लक्ष ठेवा, कधीही नुकसान होणार नाही. त्यातील चढउतारांमुळे, अनेक वेळा योग्य परतावा न मिळाल्याने लोकांची निराशा होते. हे काम आर्थिकदृष्ट्या अत्यंत जोखमीचे आहे. त्यामुळे सर्व बाबींवर लक्ष दिल्यानंतरच अधिक परतावा मिळू शकेल. स्मॉल कॅप्सच्या तुलनेत लार्ज कॅप्समध्ये गुंतवणूक करणे कमी जोखमीचे असते, एवढं नक्की.