What precautions should be taken while buying food? : नवरात्र, दसरा, दिवाळीच्या कालावधीत पनीर, खवा, मावा, मिठाई, खाद्यतेल व इतर अन्नपदार्थांमधील भेसळ वाढीला लागते. दरवर्षी ह्या संदर्भात नेहमी काही तक्रारी होत असतात. आता नागरिकांनीच ह्याबाबत जागरूक राहिले पाहिजे असे आवाहन करण्यात येते आहे.
जनजागृती – ग्राहक व अन्नपदार्थ व्यावसायिकात भेसळयुक्त गोष्टींबाबत जागृती करण्यासाठी आणि अन्नपदार्थांत भेसळीस आळा घालण्यासाठी प्रशासनामार्फत राज्यभरात अन्नपदार्थ उत्पादक, वितरक, किरकोळ विक्रेते यांना माहिती पुरवून भेसळ होणार नाही याची खबरदारी घेतली जाते.
हे वाचा: What is cholesterol? : कोलेस्ट्रॉल म्हणजे नेमकं काय? कोलेस्ट्रॉल कसं नियंत्रित ठेवायचं?
खाद्यपदार्थ विकत घेताना काय काळजी घ्यावी? (What precautions should be taken while buying food?)
पॅकेट फूड खरेदी करताना उत्पादनाची तारीख आणि अन्न खराब होण्यापूर्वीची तारीख (Date of manufacturing and Best before date) ग्राहकांनी पाहून घेणे अत्यावश्यक आहे.
सुटे अन्नपदार्थ कधी केलेले आहेत ह्याची खातरजमा करूनच विकत घ्यावीत.
मिठाई खरेदी करण्यापूर्वी ती कशी स्टोअर केलेली होती, उघड्यावर होती की स्वच्छ आणि बंद जागेत होती हे सुद्धा पाहणे आवश्यक आहे.
हे वाचा: NIPAH VIRUS : निपाह व्हायरस पाय पसरतोय?
खरेदी केल्यावर घरी आणलेले पदार्थ साठवणूकीस योग्य ठिकाणी ठेवावेत.
मिठाई ताजी असतानाच संपवणे योग्य. म्हणजे शक्यतो 8-10 तासांच्या आत ती संपवली पाहिजे.
हे वाचा: How to Remove Tan From Skin? : चेहरा, हात टॅन झालेत? कोणते उपाय केले पाहिजे? जाणून घ्या.
चॉकलेट, ड्रायफ्रुट बॉक्सेस नीट तपासून घ्यावेत. वास येणारे पदार्थ चुकूनही घेऊ नयेत.
नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या आणि स्वच्छता पाळल्या जाणाऱ्या दुकानातूच अन्नपदार्थ खरेदी करावेत.
लेबल नसलेले, बेस्ट बिफोर अशी तारीख नसलेले, रिपॅकिंग केलेले पदार्थ शक्यतो खरेदी करू नये.
What precautions should be taken while buying food? : फेरीवाल्यांकडून पनीर, खवा, मिठाई घेणे टाळावे.
ग्राहकांनी पॅकींग किंवा सीलबंद अन्नपदार्थ खरेदी करताना अन्नपदार्थांच्या लेबलवर अन्न पदार्थाचे नाव, घटक पदार्थ, nutritional information, व्हेज-नॉनव्हेज सिम्बॉल, उत्पादकाचे पूर्ण नाव व पत्ता, वजन, लॉट नं., उत्पादन दिनांक/ पॅकिग दिनांक, Best Before दिनांक, FSSAI नोंदणी क्रमांक इ . माहिती नमूद असल्याची खात्री करूनच अन्न पदार्थ खरेदी करावीत.
What precautions should be taken while buying food? : तक्रार नोंदवू शकता
दैनंदिन जीवनात अन्नपदार्थाबाबत घडलेल्या घटना तसेच अन्नपदार्थाच्या गुणवत्तेसंदर्भात तक्रार असल्यास त्या तक्रारी प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात. राज्यातील नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर Grievance portal वर अतिशय सहज व सोप्या पद्धतीने online तक्रार नोंदवली जाऊ शकते. नागरीक प्रशासनातील सर्व जिल्हा कार्यालयात दुरध्वनीद्वारे किंवा ईमेलद्वारे तसेच लेखी निवेदनाद्वारे संपर्क साधुन भेसळयुक्त पदार्थांबाबत तक्रार नोंदवू शकतात.