Thursday , 21 November 2024
Home Uncategorized UP Warriors Women Squad : यूपी वॉरियर्सच्या संघाला तर तोडच नाही; यूपी वॉरियर्सच्या संघाने कोणते खेळाडू घेतले विकत? पाहा संपूर्ण List
Uncategorized

UP Warriors Women Squad : यूपी वॉरियर्सच्या संघाला तर तोडच नाही; यूपी वॉरियर्सच्या संघाने कोणते खेळाडू घेतले विकत? पाहा संपूर्ण List

UP Warriors Women Squad : इंडियन प्रीमिअर लीग (IPL) प्रमाणेच आता वूमन्स प्रीमियर लीगचा (Women’s Premier League) थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे. वूमन्स आयपीएलच्या (WPL) पहिल्या सीझनमध्ये 5 फ्रँचायझींचे संघ असणार आहे. यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB), दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals), गुजरात जायंट्स (Gujarat Giants), मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि यूपी वॉरियर्स वूमन्स (UP Warriors Women) या संघांचा समावेश आहे.

काल झालेल्या लीलालावत यूपी वॉरियर्स वूमन्स या संघाने देखील मोठ्या खेळाडूंना आपल्या संघात सामील करून घेतलं आहे. यात भारतीय संघाची स्टार ऑलराऊंडर दीप्ती शर्माला सर्वाधिक (2.6 कोटी रुपयांची बोली लावली आहे. तसेच नुकत्याच झालेल्या अंडर 19 वूमन्स T-20 वर्ल्डकप मध्ये सर्वाधिक धावा करणारी श्वेता सेहरावत या युवा खेळाडूलाही 40 लाख रुपयांची बोली लावत आपल्या संघात सामील करून घेतलं आहे. तर यूपी वॉरियर्स वूमन्स या संघाने कोणत्या खेळाडूंवर किती लाखांची बोली लावली? जाणून घेऊयात…

हे वाचा: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरती, अशी आहे अर्ज प्रक्रिया…

असा आहे यूपी वॉरियर्सचा संघ –

यूपी वॉरियर्स वूमन्स

सोफी एक्लेस्टोन (1.8 कोटी), दीप्ती शर्मा (2.6 कोटी), ताहलिया मॅकग्रा (1.4 कोटी), शबनीम इस्माईल (1 कोटी), एलिसा हिली (70 लाख), अंजली सरवाणी (55 लाख), राजेश्वरी गायकवाड. (40 लाख), पार्शवी चोप्रा (10 लाख), श्वेता सेहरावत (40 लाख), एस. यशश्री (10 लाख), किरण नवगिरे (30 लाख), ग्रेस हॅरिस (75 लाख), देविका वैद्य (1.4 कोटी), लॉरेन बेल (30 लाख), लक्ष्मी यादव (10 लाख), सिमरन शेख (10 लाख)

प्रीमियर लीगच्या लिलावात प्रत्येक फ्रँचायझींना खेळाडू खरेदी करण्यासाठी 12 कोटी रुपयांचं बजेट देण्यात आलं होत. या बजेट मधून प्रत्येक फ्रँचायझीला कमीत कमी 15 खेळाडू आणि जास्तीत जास्त 18 खेळाडू खरेदी करावे लागणार होते.

हे वाचा: Stock Market Today:शॉर्ट सेलिंग म्हणजे काय?

वूमन्स प्रीमियर लीगचा थरार कधी रंगणार?

बीसीसीआयने अधिकृतपणे दिलेल्या माहितीनुसार वूमन्स प्रीमियर लीगचा थरार येत्या 4 मार्च ते 26 मार्च 2023 या कालावधी दरम्यान रंगणार आहे. तसेच या लीगचे सर्व सामने मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत, वूमन्स प्रीमियर लीगच्या पहिल्या सिझनमध्ये एकूण 22 सामने खेळवले जाणार आहेत.

Related Articles

Uncategorized

Diwali Ank 2024: आकर्षक कथा आणि प्रेरणादायक लेखांचा संग्रह!

Diwali ank 2024 | दिवाळी अंक 2024: मराठी साहित्याचा उत्सव दिवाळी म्हणजे...

SSC GD Constable Recruitment 2024
Uncategorized

SSC GD Constable Recruitment 2024 : SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 26 हजार 146 जागांसाठी मेगा भरती सुरु; असा करा अर्ज

SSC GD Constable Recruitment 2024 : तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी...

G20-SUMMIT-2023
Uncategorized

G20 Summit 2023 : G20 परिषद

G20 Summit 2023 – आजपासून दिल्लीत G20 परिषद सुरु झाली. कोण कोणते...

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana
Uncategorized

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना.

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana ; पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना...