उदयनीधी स्टालिन….तामिळनाडूमधले अण्णा द्रमुक नेते आणि सध्याच्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र.
त्यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याने सध्या मोठं वादळ आलं आहे.
अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे, तर काहींनी त्यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे.
माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नव्या संसद भवनाच्या उद्घाटनासाठी आमंत्रण नसणं, हेच सनातन धर्माचं उत्तम उदाहरण असल्याचं नवीन वादग्रस्त वक्तव्य उदयनिधी स्टॅलिन ह्यांनी केलं आहे. सनातन धर्माला मानणाऱ्यांना संपवण्याची भाषा मी केली नाही. माझ्या वक्तव्याबाबत कोणत्याही कायदेशीर गोष्टींना सामोरं जाण्यासाठी मी तयार आहे, असंही उदयनिधी स्टॅलिन ह्यांनी नंतर म्हंटले.
हे वाचा: Bullock Cart Race : ब्रेकिंग..! आता बैलगाडा शर्यतीचा नाद घुमणार; सुप्रीम कोर्टाची परवानगी.
सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आ
हे. चुकीच्या गोष्टी ह्या संपवल्याच पाहिजे. ज्याप्रमाणे आपण डेंग्यू, मलेरिया किंवा कोरोनाचा विरोध करू शकत नाही. त्यांना संपवतो तसेच, सनातन धर्मालाही संपवायचं आहे, असे स्टालिन ह्यांनी म्हटल्यावर राळ उठली होती.
स्टालिन ह्यांना राजकीय स्तरातूनसुद्धा विरोध झाला काहींनी त्यांना मवाळ भूमिका घेण्यास सांगितले.
यांच्या वक्तव्यावरुन भाजपाने इंडिया आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे.
हे वाचा: Caste Based Survey : शासकीय सेवेत जातीनिहाय सर्वेक्षण हाेणार...?
विरोधकांच्या आघाडीला उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यावरुन माफी मागण्याचा आग्रह धरला आहे. काहींनी उदयनिधी यांनी बोलताना संयम बाळगायला हवा, असा सल्ला दिला आहे.