Solar Rooftop Subsidy Yojana : भविष्यात किंवा आत्ताही साऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. मुख्यतः ऊर्जेचा वापर हा वीज निर्मितीसाठी सध्या होत आहे. भारत हा एक उष्णकटिबंधीय देश असल्यामुळे आपल्या देशात भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. त्यामुळे सोलर रूफटॉप घरगुती लागणाऱ्या विजेचा प्रश्न देखील सोडवला जाऊ शकतो. आता सोलर रूफटॉप बसवायला खर्च जास्त असल्यामुळे सहसा लोक हे बसवत नाही. त्यामुळे सरकारने याला प्रोत्साहन देण्यासाठी सोलर रूफटॉप सबसिडी योजना काढली आहे. यामार्फत सरकार लाभार्थ्यांना तब्बल 40 तक्क्यांपर्यंत सबसिडी मिळू शकते. नेमकी काय आहे ही योजना? जाणून घेऊयात…
Solar Rooftop Subsidy Yojana : सोलर रूफटॉप सबसिडी योजना
देशाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे तसेच उद्योग क्षेत्रामध्ये होत असलेल्या उल्लेखनीय प्रगतीमुळे देशात विजेची मागणी वाढली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी देशातील पारंपरिक ऊर्जा निर्मितीचे स्रोत कमी पडत असल्याने सरकारपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. यावरती उपाय म्हणून तसेच भविष्यातील गरज ओळखून सरकारने सोलर रूफटॉप सबसिडी योजना काढली आहे. या योजनेअंतर्गत निवासी संघटना, गृहनिर्माण संस्था तसेच वयक्तिक घरांच्या छतावर सौरऊर्जेच्या सहाय्याने वीज निर्मिती करण्यासाठी सोलर रूफटॉप सिस्टीम बसवली जाते. ह्यासाठी सरकारकडून 40 टक्केपर्यंत अनुदान देण्यात येते.
हे वाचा: Central Govt - Scrap selling : भंगार विका, पैसे मिळवा.
Solar Rooftop Subsidy Yojana : वीज विकून पैसेही मिळवू शकता
या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या विजेच्या बिलात बचत तर होणारच आहे यासोबत अधिक प्रमाणात निर्माण झालेली विज नेट मीटरिंगच्या माध्यामतून महावितरण कंपनीला विकता येण्याची सुविधा या योजनेच्या अंतर्गत आहे.
Solar Rooftop Subsidy Yojana : या योजनेंतर्गत किती सबसिडी मिळते ?
या योजनेंतर्गत 3 किलोवाट क्षमतेच्या सोलर रूफटॉप युनिटला येणारा खर्च खालीलप्रमाणे :
एखाद्या व्यक्तीला आपल्या घराच्या छतावरती 3 किलोवाट पर्यंतची सोलर रूफटॉप सिस्टीम बसवायची असेल तर त्याला अंदाजे 1 लाख 24 हजार 140 रुपया पर्यंतचा खर्च येऊ शकतो. या खर्चावरती सरकारला त्याला 40% सबसिडी देणार आहे. म्हणजेच लाभार्थ्याला 49 हजार 656 इतके अनुदान मिळेल. मूळ रकमेमधून सबसिडी वजा केली तर 3 किलोवाट पर्यंतची सोलर रूफटॉप सिस्टीम बसवण्यासाठी 74 हजार 484 रुपये एवढा खर्च येऊ शकतो. वरील सर्व आकडे सरकारकडून जाहीर दराप्रमाणे आहेत.
हे वाचा: Pradhan Mantri Swasthya Suraksha Nidhi : भारत सरकारची 5 लाखांची आरोग्य योजना.
Solar Rooftop Subsidy Yojana : योजनेचा लाभ कसा घ्यायचा?
कोणताही भारतीय नागारिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागतपत्रांची पूर्तता करायची आहे. तसेच या योजनेच्या लाभासाठी अर्ज करायचा आहे.
Solar Rooftop Subsidy Yojana : आवश्यक असलेली कागदपत्रे :
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कागपत्रे खालीलप्रमाणे :
अर्जदाराचा मोबाइल क्रमांक, आधार कार्ड, घराचे मालकी हक्क कागदपत्रे, वर्तमान विजेचे बिल, पासपोर्ट फोटो आणि उमेदवाराच्या कुटुंबाचा उत्पन्न दाखला. यासोबत अर्जदार महाराष्ट्र राज्याचा 15 वर्षा पासून रहिवासी असणे देखील आवश्यक आहे
हे वाचा: Mahamesh Yojana : राजे यशवंतराव होळकर 'महामेश योजना'; नेमकी काय आहे 'ही' योजना? जाणून घ्या
ऑनलाइन अर्ज कसा करावा?
या योजनेच्या अंतर्गत अर्ज करण्यासाठी व योजनेच्या सविस्तर माहितीसाठी या योजनेच्या राष्ट्रीय पोर्टलच्या https://solarrooftop.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.