Thursday , 16 January 2025
Home Jobs Post Office Recruitment : भारतीय डाक विभागात जवळपास 13 हजार जागांवरती बंपर भरती; अर्ज कसा आणि कुठे करायचा?
Jobs

Post Office Recruitment : भारतीय डाक विभागात जवळपास 13 हजार जागांवरती बंपर भरती; अर्ज कसा आणि कुठे करायचा?

Post Office Recruitment
Post Office Recruitment : Letstalk

Post Office Recruitment : शिक्षण कमी असणाऱ्या विद्यार्थी आणि तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. भारतीय डाक विभागात जवळपास 13 हजार रिक्त जागांवाती बंपर भरती सुरु होणार आहे. या भरती प्रक्रियेत 12 हजार 828 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. तसेच शिक्षण पात्रता अगदी दहावी पास पर्यंत असणं गरजेचं आहे. तसेच ह्यामध्ये महिला देखील अर्ज करू शकतात. त्यामुळे ही सरकारी नोकरी तुम्हाला मिळू शकते पण त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. भरती बाबतची सविस्तर माहिती खालील प्रमाणे…

महिलांना देखील संधी :

या भरती प्रक्रियेमध्ये महिला देखील अर्ज करू शकतात. त्यामुळे महिलांसाठी देखील नोकरी करण्याची चांगली संधी आहे. एवढंच नाहीतर महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना कोणतेही शुल्क ठेवण्यात आलेले नाही.

हे वाचा: Nagpur Municipal Corporation Bharati 2023 : नागपूर महानगरपालिकेमध्ये भरती सुरु; अर्ज कुठे आणि कसा करायचा? जाणून घ्या.

Post Office Recruitment : भारतीय डाक विभागात भरती सुरु

भारतीय डाक विभागात तब्बल 12 हजार 828 जागांसाठी भरती सुरु होणार आहे. या भरती बाबतची अधिकृत जाहिरात भारतीय डाक विभागाने प्रसिद्ध केली आहे. भारतीय डाक विभागाने जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीनुसार दिलेल्या माहितीनुसार या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी अर्ज कसा आणि कुठं करायचा? पात्रता काय? याबातची सर्व माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या

पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक- GDS

1) GDS – ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2) GDS – असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

हे वाचा: MPSC PSI Exam 2023 : पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा

एकूण जागा : 12 हजार 828 जागा.

शैक्षणिक पात्रता :

1) दहावी पास
2) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वयाची अट :

या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष 11 जून 2023 पर्यंत 18 ते 40 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. SC आणि ST या प्रवर्गातील उमेदवारांना वयात 5 वर्षे सूट असणार आहे तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयात 3 वर्षे सूट दिली जाणार आहे.

हे वाचा: SIDBI Recruitment 2023 : भारतीय लघु उद्योग विकास बँकेत भरती सुरु'; असा करा अर्ज

शुल्क :

SC, ST, PWD प्रवर्ग आणि महिलांसाठी कोणतेही शुक्ल नाही. उर्वरित सर्व प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

नोकरी ठिकाण : भारतात कुठेही

Post Office Recruitment : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अधिकृत वेबसाईट – येथे पहा

जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज – येथे करा.

Post Office Recruitment : महत्वाच्या तारखा

वरील भरती प्रक्रियेत 11 जून 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. तसेच अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख 12 ते 14 जून पर्यंत आहे.

या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Related Articles

MUCBF Recruitment 2024
Jobs

MUCBF Recruitment 2024 : बँकेत नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

MUCBF Recruitment 2024 : तरुणांना बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी आहे. महाराष्ट्र...

AIIA Recruitment 2024
Jobs

AIIA Recruitment 2024 : अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये भरती सुरु; असा करा अर्ज.

AIIA Recruitment 2024 : तरुणांना नोकरी करण्याची संधी आहे. आखिल भारतीय संस्थेमध्ये...

BIS Recruitment 2024
Jobs

BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

BIS Recruitment 2024 : तरुणांना सरकारी नोकरी करण्याची महत्वाची संधी आहे. भारतीय...

SBI Clerk Recruitment 2023
Jobs

SBI Clerk Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदांच्या 8 हजार 283 जागांसाठी भरती सुरु.

SBI Clerk Recruitment 2023 : बँकेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी भारताची...