MSC Bank Recruitment 2023 : ज्या तरुणांना बँक क्षेत्राशी निगडित करियर करायचं आहे, अशा तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये (Maharashtra State Cooperative Bank) भरती सुरु झालेली आहे. ह्या भरती प्रक्रिये अंतर्गत विविध महत्वाच्या पदांच्या 153 जागा भरण्यात येणार आहे. जाणून घ्या भारीविषयी सविस्तर माहिती..
MSC Bank Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती 2023
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती सुरु (Maharashtra State Cooperative Bank Recruitment 2023) झालेली आहे. या भरती अंतर्गत कनिष्ठ अधिकारी, लिपिक आणि लघुलेखक या पदांच्या जागा भरल्या जाणार आहे. ह्यामध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला आधी ऑनलाईन अर्ज दाखल कराचा आहे. त्यानंतर परीक्षा होणार आहे. ही परीक्षा प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी या पदासाठी एकूण 200 गुणांची असणार आहे. तसेच प्रशिक्षणार्थी लिपिक पदासाठी आणि लघुलेखक (मराठी) पदासाठी देखील एकूण 200 गुणांची परीक्षा असणार आहे.
हे वाचा: AHD Maharashtra Recruitment : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु; असा करा अर्ज.
ह्या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? अनुभव किती पाहिजे? तसेच अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या याबातची सविस्तर माहिती.
MSC Bank Recruitment 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्ज प्रक्रिया
पदांचा संपूर्ण तपशील खालील प्रमाणे –
हे वाचा: Talathi Bharti 2023 : 4 हजारांहून अधिक जागांसाठी तलाठी भरती सुरु; असा करा अर्ज.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | वयाची अट
(31 ऑगस्ट 2023 रोजी) |
शुल्क |
1 | प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी | 45 | 1) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
2) 02 वर्षे अनुभव. |
23 ते 32 वर्षे | 1 हजार 770 रुपये |
2 | प्रशिक्षणार्थी लिपिक | 107 | 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. | 21 ते 28 वर्षे | 1 हजार 180 रुपये |
3 | लघुलेखक (मराठी) | 01 | पदवीधर | 23 ते 32 वर्षे | 1 हजार 770 रुपये |
एकूण पदसंख्या : 153 |
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.
MSC Bank Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पाहा (Click Here)
जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात येथे पाहा
ऑनलाईन अर्ज – येथे करा (Click Here)
MSC Bank Recruitment 2023 : अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख –
वरील भरती प्रक्रियेत 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा किंवा येथे क्लीक करा.