Maharashtra PWD Bharti 2023 : सातवी, दहावी बारावी पास ते अभियांत्रिकी, डिप्लोमा, पदव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरी (Government Job) करण्याची मोठी संधी आहे. महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात (Maha PWD Recruitment 2023) मोठी भरती सुरु झाली आहे. ह्या भरती प्रक्रियेअंतर्गत अनेक महत्वाच्या जागा भरण्यात येणार आहे. जाणून घ्या या भरती विषयी सविस्तर माहिती..
Maharashtra PWD Bharti 2023 : महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात भरती सुरु
महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात (Maharashtra Public Works Department) भरती सुरु झालेली आहे. याबाबतची अधिकृत जाहिरात महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Government Job) संबंधित विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. ह्या भरती प्रक्रिये अंतर्गत (Maharashtra PWD Recruitment 2023) विविध महत्वाच्या पदांच्या एकूण 2 हजार 109 जागा भरण्यात येणार आहे. ह्या साठी शैक्षणिक पात्रता सातवी पास पासून ते डिप्लोमा, इंजिनीअरिंग पर्यंत असणार आहे. पदांनुसार सहशैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी असणार आहे. ह्या भरती प्रक्रियेसाठी आजपासून म्हणजेच 16 ऑक्टोबर 2023 पासून तुम्ही ऑनलाईन अर्ज दाखल करणयास सुरुवात झाली आहे. ह्या भरती प्रक्रियेअंतर्गत कोणकोणत्या जागा भरण्यात येणार आहे? ह्यासाठी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा काय आहे? तसेच ऑनलाईन अर्ज कुठे आणि कसा करायचा? जाणून घ्या या बाबतची सविस्तर माहिती.
हे वाचा: Nashik ZP Recruitment: नाशिक जिपमध्ये १०३८जागांसाठी भरती
Maharashtra PWD Bharti 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्ज प्रक्रिया
पदांचा संपूर्ण तपशील पुढील प्रमाणे –
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
|
1 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 532 जागा | 1) 10वी उत्तीर्ण हे वाचा: IB Recruitment 2023 : केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु; असा करा अर्ज 2) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा |
2 | कनिष्ठ अभियंता (विद्युत) | 55 जागा | 1) 10वी उत्तीर्ण
2) विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा |
3 | कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ | 05 जागा | 1) 10वी व 12वी उत्तीर्ण
2) वास्तुशास्त्रज्ञ पदवी हे वाचा: Post Office job 2023 : भारतीय डाक विभागात 30 हजारांपेक्षा अधिक जागांवरती बंपर भरती सुरु. 3) कॉन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांचे सदस्य |
4 | स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक | 1 हजार 378 जागा | 1) 10वी उत्तीर्ण
2) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन कोर्स किंवा कंस्ट्रक्शन सुपरवाइजर कोर्स 3) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर पदवी अशी उच्च शैक्षणिक अर्हता असलेले उमेदवार पात्र ठरतात |
5 | लघुलेखक (उच्च श्रेणी) | 08 जागा | 1) 10वी उत्तीर्ण
2) लघुलेखन 120 श.प्र.मि. 3) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. |
6 | लघुलेखक (निम्न श्रेणी) | 02 जागा | 1) 10वी उत्तीर्ण
2) लघुलेखन 100 श.प्र.मि. 3) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. |
7 | उद्यान पर्यवेक्षक | 12 जागा | 1) कृषी किंवा उद्यानविद्या पदवी
2) 02 वर्षे अनुभव |
8 | सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ | 09 जागा | 1) 10वी व 12वी उत्तीर्ण
2) वास्तुशास्त्राची पदवी |
9 | स्वच्छता निरीक्षक | 01 जागा | 1) 10वी उत्तीर्ण
2) स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र |
10 | वरिष्ठ लिपिक | 27 जागा | 1) 10वी उत्तीर्ण
2) कोणत्याही शाखेतील पदवी |
11 | प्रयोगशाळा सहाय्यक | 05 जागा | 1) 10वी उत्तीर्ण
2) विज्ञान शाखेतील पदवी (रसायन प्रमुख विषय) किंवा कृषी पदवी |
12 | वाहन चालक | 02 जागा | 1) 10वी उत्तीर्ण
2) हलके किंवा मध्यम किंवा जड प्रवासी वाहन चालक परवाना 3) 03 वर्षे अनुभव |
13 | स्वच्छक | 32 जागा | 07वी उत्तीर्ण |
14 | शिपाई | 41 जागा | 10वी उत्तीर्ण |
एकूण पदसंख्या : | 2 हजार 109 जागा |
सरकारी नोकरी : वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 06 नोव्हेंबर 2023 पर्यंत 18 ते 40 वर्षे या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीय प्रवर्ग, अनाथ, आदुघ तसेच दिव्यांग उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षे सूट असणार आहे.
सरकारी नोकरी : शुल्क
या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जनरल आणि ओबीसी (OBC) या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये (₹1000/-) शुल्क असणार आहे तर मागासवर्गीय प्रवर्ग, अनाथ, आदुघ तसेच दिव्यांग उमेदवारांना नऊशे रुपये (₹900/-) शुल्क असणार आहे.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
Maharashtra PWD Bharti 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पाहा (Click Here)
जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात येथे पाहा
ऑनलाईन अर्ज – येथे करा (Click Here)
Maharashtra PWD Bharti 2023 : अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख –
वरील भरती प्रक्रियेत 06 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. या नोकरी संबंधिताच्या अधिक आणि सविस्तर माहितीसाठी कृपया वरती देलेली जाहिरात पाहा किंवा इथे क्लीक करा (Click Here).