Thursday , 8 June 2023
Home Uncategorized Madhya Pradesh Breakfast : हिंदुस्थान के दिल का नाश्ता! मध्य प्रदेशमधील काही लोकप्रिय नाश्त्याचे पर्याय.
Uncategorized

Madhya Pradesh Breakfast : हिंदुस्थान के दिल का नाश्ता! मध्य प्रदेशमधील काही लोकप्रिय नाश्त्याचे पर्याय.

Madhya Pradesh Breakfast

Madhya Pradesh Breakfast : मध्य प्रदेशातील टुरिझमच्या जाहिरातीत हिंदुस्थान का दिल देखो अशी ओळ आपण ऐकली असेलच. एमपी मधल्या न्याहारीचे विविध पर्याय तुमच्या दिवसाची करतात स्वादिष्ट सुरुवात.

Madhya Pradesh Breakfast

मध्य भारतातील एक राज्य, जे त्याच्या समृद्ध इतिहासासाठी, विविध संस्कृतीसाठी आणि स्वादिष्ट पाककृतींसाठी ओळखले जाते. पौष्टिक आणि रुचकर अशा नाश्त्याच्या विविध पर्यायांनी समृद्ध असे मध्य प्रदेशातील सर्वात लोकप्रिय नाश्ता पर्याय :

हे वाचा: If You Struggle To Hit Your Goals, Try This Instead

एमपी मधील सर्वात लोकप्रिय नाश्त्याचे पर्याय –

पोहे :

पोहे हा पदार्थ भारतभर केला जातो. कांदे, टोमॅटो आणि विविध मसाल्यांनी सजवलेले पोहे इथं रोज चवीने खाल्ले जातात. वरतून शेव आणि डाळिंब घालून तळलेल्या शेंगदाण्यासोबत दिला जाणारा हलका असा पौष्टिक पदार्थ. सोबत जिलेबी पण अनेक जण खातात.

हेही वाचा : मज्जानु नाश्ता ! गुजरातमधील काही लोकप्रिय नाश्त्याचे पर्याय

साबुदाणा खिचडी :

साबुदाणा खिचडी हा बटाटे, शेंगदाणे आणि फुललेल्या साबुदाण्याने तयार केलेला एक लोकप्रिय असा नाश्ता आहे. ही एक पोटाला जड पण पौष्टिक डिश आहे.

समोसे :

समोसे हा मध्य प्रदेशातील एक लोकप्रिय स्नॅक प्रकार आहे आणि बर्‍याचदा न्याहारीसाठी त्याचा आनंद घेतला जातो. मसालेदार अशी बटाटे, मटार घातलेली भाजीचे सारण भरून केलेले सामोसे चिंचेच्या किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर सर्व्ह केले जातात.

हे वाचा: Rashi Bhavishya : 16 मार्च 2023 : आज तुमचा दिवस कसा राहिल? वाचा…

भुट्टा किंवा मक्याच्या कणसाचा कीस :

भोपाळ, इंदूरमधील एक अनोखा असा नाश्ता. किसलेले कॉर्न, परतलेला कांदा आणि थोडेसे मसाले घालून केलेली ही एक चवदार डिश आहे. वरतून कुरकुरीत शेव घालून ही डिश दिली जाते. हलका फुलका आणि चविष्ट हेल्दी नाश्ता प्रकार.

पालक पुरी :

पालकाची प्युरी आणि विविध पीठं एकत्र करून छोट्या गोल पुऱ्या लाटून मस्त टम्म तळलेल्या पुऱ्या लोणच्यासोबत अनेक जण डब्यात ऑफिसला किंवा शाळेत नेतात.

पौष्टिक आणि स्वादिष्ट अशा विविध नाश्त्याच्या प्रकारांची रेलचेल मध्यप्रदेश मध्ये मिळेल. चवदार साबुदाणा खिचडीपासून ते गोड जिलेबी आणि फाफड्यापर्यंत, खस्ता कचोरीपासून डाळीचे बाफले, पापड भाजी पर्यंत प्रत्येकासाठी काही ना काही नक्कीच मिळेल.

हे वाचा: WPL Gujarat Giants Squad : गुजरातच्या संघाने कोणते खेळाडू घेतले विकत? पहा संपूर्ण यादी.

Related Articles

AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु.
Uncategorized

AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु.

AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु. पशुसंवर्धन...

Uncategorized

Job Update : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात विविध पदांसाठी भरती सुरु.

Job Update : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात जवळपास 5 हजार विविध...

Uncategorized

EV Market :EV चे मार्केट आहे फुल्ल जोरात

EV market : इलेक्ट्रिक वाहनांच्या (EVs) बाजारपेठेत लक्षणीय वाढ होते आहे आणि...

मसालेदार मार्केट
Uncategorized

Spicy Market : मसालेदार मार्केट.

Spicy Market : भारतीय मसाल्यांचे मार्केट आता चांगलेच लोकप्रिय झालेले आहे. हा...