Madhya Pradesh Breakfast : मध्य प्रदेशातील टुरिझमच्या जाहिरातीत हिंदुस्थान का दिल देखो अशी ओळ आपण ऐकली असेलच. एमपी मधल्या न्याहारीचे विविध पर्याय तुमच्या दिवसाची करतात स्वादिष्ट सुरुवात.
मध्य भारतातील एक राज्य, जे त्याच्या समृद्ध इतिहासासाठी, विविध संस्कृतीसाठी आणि स्वादिष्ट पाककृतींसाठी ओळखले जाते. पौष्टिक आणि रुचकर अशा नाश्त्याच्या विविध पर्यायांनी समृद्ध असे मध्य प्रदेशातील सर्वात लोकप्रिय नाश्ता पर्याय :
हे वाचा: Chief Ministers of Indian States : कोणत्या राज्याचे कोण मुख्यमंत्री?
एमपी मधील सर्वात लोकप्रिय नाश्त्याचे पर्याय –
पोहे :
पोहे हा पदार्थ भारतभर केला जातो. कांदे, टोमॅटो आणि विविध मसाल्यांनी सजवलेले पोहे इथं रोज चवीने खाल्ले जातात. वरतून शेव आणि डाळिंब घालून तळलेल्या शेंगदाण्यासोबत दिला जाणारा हलका असा पौष्टिक पदार्थ. सोबत जिलेबी पण अनेक जण खातात.
हेही वाचा : मज्जानु नाश्ता ! गुजरातमधील काही लोकप्रिय नाश्त्याचे पर्याय
साबुदाणा खिचडी :
साबुदाणा खिचडी हा बटाटे, शेंगदाणे आणि फुललेल्या साबुदाण्याने तयार केलेला एक लोकप्रिय असा नाश्ता आहे. ही एक पोटाला जड पण पौष्टिक डिश आहे.
समोसे :
समोसे हा मध्य प्रदेशातील एक लोकप्रिय स्नॅक प्रकार आहे आणि बर्याचदा न्याहारीसाठी त्याचा आनंद घेतला जातो. मसालेदार अशी बटाटे, मटार घातलेली भाजीचे सारण भरून केलेले सामोसे चिंचेच्या किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर सर्व्ह केले जातात.
हे वाचा: 2 एप्रिल 2023 : आज तुमचा दिवस कसा राहिल? वाचा…
भुट्टा किंवा मक्याच्या कणसाचा कीस :
भोपाळ, इंदूरमधील एक अनोखा असा नाश्ता. किसलेले कॉर्न, परतलेला कांदा आणि थोडेसे मसाले घालून केलेली ही एक चवदार डिश आहे. वरतून कुरकुरीत शेव घालून ही डिश दिली जाते. हलका फुलका आणि चविष्ट हेल्दी नाश्ता प्रकार.
पालक पुरी :
पालकाची प्युरी आणि विविध पीठं एकत्र करून छोट्या गोल पुऱ्या लाटून मस्त टम्म तळलेल्या पुऱ्या लोणच्यासोबत अनेक जण डब्यात ऑफिसला किंवा शाळेत नेतात.
पौष्टिक आणि स्वादिष्ट अशा विविध नाश्त्याच्या प्रकारांची रेलचेल मध्यप्रदेश मध्ये मिळेल. चवदार साबुदाणा खिचडीपासून ते गोड जिलेबी आणि फाफड्यापर्यंत, खस्ता कचोरीपासून डाळीचे बाफले, पापड भाजी पर्यंत प्रत्येकासाठी काही ना काही नक्कीच मिळेल.
हे वाचा: business : 1 लाख रुपयांत सुरू करा 'हा' व्यवसाय, लग्नाच्या हंगामात बंपर कमाई फिक्स