LIC Gets Income Tax Penalty Notice Of Rs 84 Cr : भारत सरकारच्या मालकीची असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाला (LIC) आयकर विभागाने धक्का दिला आहे. आयकर विभागाने LIC ला दंडाची नाेटीस बजावली आहे. तीन मूल्यांकन वर्षांसाठी 84 काेटी रुपयांच्या दंडाची ही नाेटीस आहे. LIC ने या नाेटीस विराेधात अपील करण्याचा निर्णय घेतला आहे.
LIC Gets Income Tax Penalty Notice Of Rs 84 Cr : LIC ला आयकरकडून 84 काेटी भरण्याची नाेटीस
आयकर विभागाने शेअर बाजारांना नाेटीस पाठवली आहे. त्यात म्हटले आहे की, आयकर विभागाने 2012-13 या मूल्यांकन वर्षासाठी कंपनीला 12.61 काेटी रुपयांचा दंड ठाेठावला आहे.
हे वाचा: Nashik ZP Recruitment: नाशिक जिपमध्ये १०३८जागांसाठी भरती
हेही वाचा : what is Income Tax Return : इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) म्हणजे काय?
2018-19 च्या मूल्यांकन वर्षासाठी 33.82 काेटी रुपये आणि 2019-20 साठी 37.58 काेटी रुपयांची नाेटीस बजावली आहे. असा एकूण दंड 84 काेटी रुपये आहे.
LIC Gets Income Tax Penalty Notice Of Rs 84 Cr : या कायद्यानुसार नोटीस पटवली
हा दंड आयकर विभागाने आयकर कायदा 1961 च्या कलम 271 (1) (C) आणि 270 (A) नुसार लावला आहे. आयकर विभागाने यापूर्वी 29 सप्टेंबर 2023 राेजी LIC ला ही दंडाची नाेटीस पाठवली हाेती. ती कंपनीला 3 ऑक्टोबरला मिळाली आहे.
GST अधिकाऱ्यांनी LIC वर पाॅलिसीधारकांकडून प्रीमियम पेमेंटवर घेतलेल्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा परतावा न देणे यासह काही उल्लंघांनाचा आराेप केला आहे. व्याज आणि दंडासह GST भरण्याची मागणी केली आहे.