Job Update : आधी कोरोना आणि आता आर्थिक मंदीचं संकट. यामुळे अनेकांना आल्या नोकरीवर पाणी सोडावं लागलं आहे. तसेच अशा परिस्थितीत पुन्हा नोकर भरती सुरु होईल का नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जरी नोकर भरती निघाली तरी कमी शिक्षण झालेल्या तरुणांना त्याचा फायदा होईल कि नाही हे सांगता येत नाही. आता अशाच तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. नोकरीच स्वप्न उराशी बाळगून असणाऱ्या तरुणांसाठी केंद्र सरकार संचालित कंपनीमध्ये काम करण्याची संधी आहे. भारत सरकारच्या यंत्र इंडिया लिमिटेड या कंपनीत विविध पदांच्या 5 हजारांहून अधिक रिक्त जागांसाठी भरती सुरु झालेली आहे. ज्या उमेदवारांना या भरतीमध्ये भाग घ्यायचा आहे असे इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या माहितीच्या आधारे यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
JOB UPDATE : पदांचे नाव आणि तपशील –
यंत्र इंडिया लिमिटेडमध्ये ITI अप्रेंटिस पदाच्या 3 हजार 508 रिक्त जागा भरल्या जाणार आहे तर नॉन ITI अप्रेंटिसच्या 1 हजार 887 जागा भरल्या जाणार आहेत.
हे वाचा: Horoscope:10 एप्रिल 2023 : आज तुमचा दिवस कसा राहिल? वाचा…
JOB UPDATE : शैक्षणिक पात्रता –
ITI अप्रेंटिस या पदासाठी 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि ITI च्या संबंधित ट्रेड मध्ये ITI 50% गुण आवश्यक आहे तर नॉन ITI अप्रेंटिस या पदासाठी उमेदवार 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण पाहिजे.
JOB UPDATE : वयाची अट –
या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 मार्च 2023 रोजी 18 ते 24 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच SC आणि ST या प्रवर्गाच्या उमेदवारांना वयात 5 वर्षे सूट देण्यात आली आहे तर OBC या प्रवर्गासाठी 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
JOB UPDATE : परीक्षा शुल्क –
अर्ज करताना जनरल, OBC आणि EWS या प्रवर्गातील उमेदवारांना 200 रुपये शुल्क भरावे लागणार आहे तर SC, ST, PWD आणि महिला यांच्यासाठी 100 रुपये शुल्क असणार आहे.
हे वाचा: Rashi Bhavishya : 30 मार्च 2023 : आज तुमचा दिवस कसा राहिल? वाचा…
JOB UPDATE : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा.
ऑनलाईन अर्ज – ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
हे वाचा: Highest Salaried job in India : भारतात 'या' नोकऱ्यांना लाखांमध्ये पगार, पाहा यादी!
JOB UPDATE : महत्वाच्या तारखा :
वरील भरती प्रक्रियेत अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2023 पर्यंत असणार आहे. तर अर्ज भरायला उद्यापासून म्हणजेच 1 मार्च 2023 पासून सुरुवात होणार आहे.