How to Prepare For Interview : कोणत्याही नोकरीसाठी मुलाखत सर्वात ही महत्वाची गोष्ट असते. आपण मुलाखत किंवा इंटरव्यूव्ह कसा देतो यावर आपल्याला नोकरी मिळणार की नाही हे अवलंबून असतं. असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. त्यामुळे सर्वजण मुलाखतीची चांगली कसून तयारी करत असतात.
नोकरीसाठी मुलाखतीला जाताना बऱ्याच गोष्टींची तयारी करावी लागते. मुलाखतीची तयारी करण्यात तुम्हाला मदत करणाऱ्या काही सोप्या गोष्टी :
हे वाचा: I Turned My Home Into a Fortress of Surveillance
How to Prepare For Interview : जिथे नोकरीला जाणार आहात त्या कंपनीबद्दल थोडी माहिती घ्या –
मुलाखतीपूर्वी कंपनीचे ध्येय, मूल्ये आणि संस्कृती म्हणजे कम्पनी वर्क कल्चरबद्दल माहिती काढून घ्या. ह्यामुळे कंपनीची उद्दिष्ट्ये लक्षात येतील.
How to Prepare For Interview : प्रश्नांचा सराव करा –
नॉर्मली कोणत्याही मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या सामान्य प्रश्नांची उत्तरे देण्याचा सराव करा. ह्यामुळे प्रत्यक्ष मुलाखतीदरम्यान अधिक आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. Tell me something about yourself सारख्या नेहमीच्या प्रश्नांची थोडक्यात पण रंजक उत्तरे द्या.
How to Prepare For Interview : आजवरच्या अनुभवाचा उपयोग करा –
तुमच्या आजवरच्या कामातल्या अनुभवांची नोंद डोक्यात ठेवा आणि त्याची पटकन समजू शकेल अशी मांडणी तयार करा. ज्यामुळे तुमच्या कौशल्याची (Skills) आणि क्षमतेची (Capacity) पातळी लक्षात येईल.
हे वाचा: तुमच्यासाठी जिओचा बेस्ट रिचार्ज प्लॅन कोणता? एकदा संपूर्ण यादी तपासून पाहा..
How to Prepare For Interview : योग्य पोशाख करा –
तुम्ही ज्या नोकरीसाठी अर्ज करत आहात त्याला अनुसरून त्यासाठी व्यावसायिक आणि योग्य कपडे घाला.
How to Prepare For Interview : वक्तशीर रहा –
मुलाखतीसाठी वेळेवर पोहोचा. यावरून तुम्ही वेळेचा आदर करता आणि नोकरीबद्दल गंभीर आहात हे दिसून येते.
How to Prepare For Interview : चांगली छाप पाडा –
मुलाखतकाराला हसतमुखाने, हातमिळवणीने आणि सकारात्मक देहबोलीने अभिवादन करा.
हे वाचा: 26 February 2023 : आज तुमचा दिवस कसा राहिल? वाचा…
How to Prepare For Interview : काळजीपूर्वक ऐका –
मुलाखतकाराचे प्रश्न काळजीपूर्वक ऐका आणि त्यांची थेट आणि स्पष्टपणे उत्तरे द्या. त्यांचं विचारून झाल्यावर मगच उत्तर द्या.
How to Prepare For Interview : सकारात्मक राहा –
तुम्हाला कठीण प्रश्न विचारला गेला तरीही संपूर्ण मुलाखतीत सकारात्मक रहा.
नोकरी संदर्भातील मुलाखतीत काम, अनुभव जसा विचारात घेतला जातो तसा मुलाखतीला आलेल्या उमेदवाराचे विचार, आचार, राहणीमान, व्यक्तिमत्व ह्या गोष्टींकडे पण लक्ष दिले जाते.
कर हर मैदान फतेह . . .